
Mira-Bhayandar Municipal Corporation: मीरा-भाईंदरमध्ये मालमत्ता कर वसुलीला वेग; ६१ टक्के उद्दिष्ट पूर्ण
हेही वाचा: Baramati Accident : फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीचे पार्थिव निवासस्थानी दाखल! अडीच वर्षांचा संसार मोडला
आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाईचे निर्देश देण्यात आले. क्षेत्रनिहाय कृती आराखडे तयार करणे, ऑनलाइन मालमत्ता कर भरणा करण्यास प्रोत्साहन देणे आणि डिजिटल माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती मोहिमा राबविण्याची गरज यावर त्यांनी भर दिला, नियमानुसार नोटिसा जारी करणे, मालमत्ता जप्ती करणे आणि आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना कर वसुलीच्या जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आदेश देण्यात आले.
महापालिकेने चालू आर्थिक वर्षासाठी ३३४ कोटींचे मालमता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, २८ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत एकूण २०७ कोटी २८ लाख ४७ हजार ८०६ रुपये वसूल झाले आहेत, जे उद्दिष्टाच्या अंदाजे ६१ टक्के आहे. यापैकी १,४२.७८१ मालमता मालकांनी ११० कोटी ७१ लाख ४८ हजार ९४८ रुपये ऑनलाइन भरले, तर १.३२,७३४ मालमता मालकानी ९६ कोटी ५६ लाख ९८ हजार ८५९ रुपये ऑफलाइन (रोख आणि चेक) भरले.
हेही वाचा: “मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी…”, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राधाकृष्ण विखे-पाटलांचे महत्त्वाचे निर्देश
याप्रसंगी आयुक्त आणि प्रशासक शर्मा यांनी नागरिकांना आवाहन केले की, शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या मजबूत विकासासाठी मालमत्ता करांचा वेळेवर आणि पूर्ण भरणा करणे आवश्यक आहे. त्यांनी नागरिकांना मीरा-भाईंदर महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.