मुंबई : ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटावर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनीही प्रियांका चतुर्वेदींवर टीकास्त्र सोडले. त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या विधानाचा पुनरुच्चार करत टीका केली.
मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला.
संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून…
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) July 30, 2023
उद्धव ठाकरे गटाकडून शनिवारी उत्तर भारतीयांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. त्यावर शिरसाट म्हणाले की, ‘प्रियांका चतुर्वेदी आपल्या भाषणात म्हणतात की देशद्रोह्यांना माफी नाही. त्या स्वतः काँग्रेसशी गद्दारी करून शिवसेनेत आल्या आहेत आणि आम्हाला देशद्रोही म्हणत आहेत. एकदा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले होते की, आदित्य ठाकरे यांनी प्रियांका चतुर्वेदींना त्यांचे सौंदर्य पाहून राज्यसभा सदस्य केले होते. प्रियांका चतुर्वेदींनी आम्हाला देशद्रोही म्हणणे हा मोठा विनोद आहे.’
प्रियांका चतुर्वेदींचा पलटवार
मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही. ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला. संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले, असे त्यांनी म्हटले आहे.