(प्रतिनिधी – विजय काते) भाईंदर : गणेशोत्सवाला फक्त एक दिवस शिल्लक आहे, महाराष्ट्रामध्ये घरोघरी या सणाच्या वेळी मोठे उत्सवाचे वातावरण पाहायला मिळते. विशेषतः कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. गणेशोत्सवानिमित्त कुटुंबियांसह जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. यंदाच्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कोकणातील गणेशउत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. मुंबईत स्थाईक झालेले कोकणवासीयांची गणपती उत्सवासाठी घरी जाण्याची लगबग असते. या साठी सहा महिन्यांपूर्वी बुकिंग केले जाते.
प्रमुख्याने रेल्वे आणि बसद्वारे कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. यंदा कोकणात गणपतीसाठी दरवर्षीप्रमाने यंदाही जाणाऱ्यां चाकरमान्यांसाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्फत मोफत एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या चार महिने आधीच कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांसमोर गावी कसे जायचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनाचे आमदार प्रताप सरनाईक हे गणेशभक्तांच्या मदतीला धावले आहेत. गणपतीला जाऊ इच्छिणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर शहरातील चाकरमान्यांसाठी शिवसेना तर्फे 60 मोफत बसेस सोडणार आहेत.
हेदेखील वाचा – आमदार विश्वनाथ भोईर यांचा केडीएमसी प्रशासनाला अल्टीमेटम, आयुक्तांसोबत पार पडली बैठक
ठाण्यातील गणेशभक्तांना महाड, खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, साखरपा, राजापूर, कणकवली, देवगड, मालवण, सावंतवाडी, सुधागड-पाली तसेच पश्चिम महाराष्ट्रात सांगली-सातारा येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहे.आमदार प्रताप सरनाईक यांच्या या सुत्य उपक्रमाचे सर्व जनतेकडून कौतुक केले जातं आहे तसेच मिरा भाईंदर गवळी समाज संघटने मार्फत आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी केली होती की,कोकणात जाण्यासाठी आम्हाला गाड्या मिळाव्यात यावर आमदाराणी मागणी मान्य करून उपलब्ध करण्यात आले आहे यासाठी आमदारांचे आभार मानले आहेत.