Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिपळूणातील २२०० कोटींचा पूर्व पूरनियंत्रण प्राथमिक आराखडा नागरिकांसाठी खुला करावा; शेखर निकम यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

चिपळूण पुर नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेला २२०० कोटींचा पुर्व प्राथमिक आराखडा येत्या दहा-पंधरा दिवसांत नागरीकांसाठी खुला करावा, अशा सुचना आमदार शेखर निकम यांनी सोमवारी येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

  • By नारायण परब
Updated On: Dec 24, 2024 | 09:29 PM
चिपळूणातील २२०० कोटींचा पूर्व पूरनियंत्रण प्राथमिक आराखडा नागरिकांसाठी खुला करावा; शेखर निकम यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
Follow Us
Close
Follow Us:

गेल्या पाच वर्षात चिपळूण शहर विकासासाठी कोट्यवधी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पुरनियंत्रणासाठी २१ कोटीच्या नलावडा बंधाऱ्यासह २२५ कोटीच्या संरक्षक भिंत प्रस्तावावर लवकरच निर्णय होईल. त्याचबरोबर पुर नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेला २२०० कोटींचा पुर्व प्राथमिक आराखडा येत्या दहा-पंधरा दिवसांत नागरीकांसाठी खुला करावा, अशा सुचना आमदार शेखर निकम यांनी सोमवारी येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पावसाळयात ठप्प असलेल्या वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा आणि शहराला पुराचा धोका असलेल्या नलावडा बंधाऱ्याच्या ठिकाणी २१ कोटी रूपये खर्चुन बांधण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ आमदार निकम यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, सन २००५ आणि त्यानंतर २०२१ ला महापूराने चिपळूण उध्वस्त केले. महापूरानंतर शहर परिसरातील पुर नियंत्रणासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात मला यश आले. गेल्या पाच वर्षात शहरासाठी ३५० कोटींचा निधी आणला. त्याचबरोबर नदी किनारा भागात संरक्षक भिंत उभारण्यासाठी २८५ कोटींचा प्रस्ताव शासनदरबारी गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यापर्यत चिपळूणचा प्रश्न पोहोचलेला आहे. त्यांनीही सकारात्मकता दर्शवलेली असल्याने सारे प्रश्न लवकरच सुटतील. शहरातील पुरनियंत्रणासाठी २०० कोटींचा शहराचा पुर्व प्राथमिक आराखडा जलसंपदा विभागाने तयार केला आहे. तो आराखडा नेमका कसा आहे, त्यामध्ये काय समाविष्ठ आहे, अजून काय करता येईल याबाबत सुचना लेखी स्वरूपात जनतेने दिल्यास त्यावर विचार करून योग्य ती दुरूस्ती केली जाईल. यासाठी लवकरच तो आराखडा जलसंपदा विभागाने जनतेसाठी खुला करावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

गेल्या पाच वर्षात चिपळूण शहरात तब्बल ३५० कोटींची विकासकामे होऊनही विधानसभा निवडणूकीत पिछाडीवर पडावे लागले, याचे शल्य आमदार शेखर निकम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्याना बोचत असताना सोमवारी झालेल्या कार्यक्रमात आमदार निकम यांनी हसत हसत आपली खंत बोलून दाखवली. २०१९ च्या निवडणुकीत शहरात काही काम केलेली नसतानाही शहराने मला आठ हजाराचे मताधिक्य दिले. तर आता कामे करूनही अडचण होतेय की काय असं मला वाटतयं. पण आता तो महत्वाचा विषय नाही. शहर आणि मतदारसंघ विकासाच्यादृष्टीने काम करत राहणं हे माझ्यादृष्टीने महत्वाचे आहे.

बचाव समिताच्यावतीने माजी नगरसेवक अरूण भोजने यांनी सांगीतले की, आजला नलावडा बंधाऱ्याचे काम होतंय हे चिपळूणच्यादृष्टीने फार महत्वाचे आहे. पुर नियंत्रणाच्यादृष्टीने आपण अर्धी लढाई जिंकली आहे. २००५ ला नलावडा बंधारा फुटल्यानंतर तो पुन्हा बांधण्यासाठी आजपर्यत कुणाला जे जमलं नाही ते आमदार निकम यांनी करून दाखवलं.

यावेळी जलसंपदाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, उपअभियंता विपूल खोत, अर्बन बँकेचे माजी संचालक उमेश काटकर, क्रेडाईचे राज्य सहसेकेटरी राजेश वाजे, शाहनवाज शाह नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, अनंत मोरे, शिवसेना तालूकाप्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, माजी सभापती पुजा निकम, मिलींद कापडी, उदय ओतारी भाजपाचे आशिष खातू, विजय चितळे, विनोद भोबस्कर, आरपीआयचे प्रशांत मोहीते, उमेश सकपाळ, वालोपे माजी सरपंच रवींद्र तांबीटकर आदी उपस्थित होते.

Web Title: Mla shekhar nikam instructs officials to make the preliminary flood control plan worth rs 2200 crores open to citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 09:29 PM

Topics:  

  • maharashtra
  • Shekhar Nikam

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
3

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
4

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.