फोटो सौजन्य: iStock
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत मागाठाणे-बोरिवली ते ठाणे (टिकुजिनीवाडी) दरम्यान प्रस्तावित दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे उपनगरी भागातील वाहतूक सुलभ होणार असून, मुंबई आणि ठाणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
या प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या मागाठाणे परिसरातील रूपवते नगर, मिलिंद नगर, फरलेवाडी, SRA प्रकल्पातील आणि रस्त्यालगतच्या फूटपाथवरील सुमारे ५७२ झोपड्या बाधित होणार आहेत. त्यामुळे या कुटुंबांचे पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे. प्रकल्पाच्या वेळेत पूर्णतेसाठी आणि प्रकल्पग्रस्त नागरिकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी MMRDAने पुढाकार घेतला असून, पुनर्वसनासाठी तीन पर्याय जाहीर केले आहेत.
MMRDAच्या धोरणानुसार, प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या झोपडीच्या क्षेत्रफळानुसार योग्य त्या आर्थिक मोबदल्याची ऑफर दिली जाईल. हा मोबदला संबंधित नागरिकांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जाईल. या पर्यायातून अनेक कुटुंबांना स्वतःच्या पसंतीनुसार नवीन जागी स्थलांतर करण्याचा पर्याय मिळतो.
वादळी वाऱ्याने उडले छप्पर, शाळा झाली गळकी; मोखाड्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
प्राधिकरणामार्फत बोरीवली इंटिग्रेटेड वसाहतीमध्ये तयार करण्यात आलेल्या सदनिकांमध्ये किंवा मीरा-भाईंदर येथील रेंटल हाऊसिंग योजनेत मे. गुजरात व सोनम इंटरप्रायझेसने बांधलेल्या सदनिकांमध्ये प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी निवास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही घरे आधुनिक पायाभूत सुविधांसह असणार आहेत.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) माध्यमातून मे. भारद्वाज विकसकाद्वारे राबविण्यात येणाऱ्या SRA योजनेत प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मूळ ठिकाणी पुनर्वसनाची संधी दिली जाईल. सदनिकेचे वितरण होताना सुरुवातीला तात्पुरते भाडे किंवा पर्यायी निवास देण्यात येईल, त्यानंतर कायमस्वरूपी सदनिकेचा ताबा दिला जाईल.
MMRDAने सर्व प्रकल्पग्रस्तांना आवाहन केले आहे की, त्यांनी या तीनपैकी आपल्याला योग्य वाटणारा पर्याय निवडावा व त्यासंबंधित लेखी अर्ज लवकरात लवकर प्राधिकरणाकडे सादर करावा. अर्ज सादर झाल्यानंतर संबंधित कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली जाईल.
शिवसेनेच्या फुटीमागे वहिनींचा हात…; भरत गोगावलेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, चर्चांना उधाण
अधिक माहितीसाठी किंवा अर्ज सादर करताना मदतीसाठी उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे (022-26597494) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एमएमआरडीएने केले आहे.
हा प्रकल्प केवळ वाहतूकसुविधा सुधारण्यासाठी नाही, तर सामाजिकदृष्ट्या न्याय्य पुनर्वसनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.