
MNGL, PNG Gas, Pune News, Pimpri Chinchwad News,
पुणे, पिंपरी-चिंचवडसह चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसराला पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा केला जातो. सध्या १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत सुमारे ९४५ रुपये असून, पीएनजीचा दर प्रति मानक घनमीटर ५१ रुपये ५० पैसे आहे. दैनंदिन वापराचा विचार करता एलपीजीच्या तुलनेत पीएनजीमुळे सुमारे १० ते १५ टक्के बचत होत असल्याचे एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्य पीएनजी पाइपलाइन पोहोचलेल्या सोसायट्यांमध्ये सुरुवातीला केवळ २० टक्के घरांमध्ये पीएनजीचा वापर होत असल्याचे एमएनजीएलच्या पाहणीत आढळले होते. त्यानंतर सहकार विभागाच्या सहकार्याने सोसायट्यांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमुळे अनेक सोसायट्यांमध्ये पीएनजी वापरणाऱ्या घरांची संख्या वाढली असून, काही सोसायट्यांमध्ये शंभर टक्के घरांमध्ये पीएनजी जोडणी झाली आहे.
पीएनजीची मागणी वाढत असली तरी घराघरांत जोडणी देताना एमएनजीएलसमोर काही अडचणी आहेत. गॅस जोडणीसाठी आवश्यक असलेल्या कुशल प्लंबरचा तुटवडा जाणवत आहे. तसेच रस्ते खोदाईसाठी पुणे महापालिकेकडून आकारले जाणारे शुल्क अधिक असल्याने त्यात कपात करण्याची मागणी केली जात आहे.
Abhijeet Dipke CJP: आमची मते हवी असतील तर….; हिंगोलीच्या शाळेतून अभिजीत दिपकेंचा राज्य सरकारला थे
‘गॅसिफाइड एरिया’मध्ये पीएनजीसाठी नोंदणी करणाऱ्या नवीन ग्राहकांना पहिल्या बिलात ५०० रुपयांची सवलत दिली जाणार आहे. अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याने ग्राहकांची सुमारे १,५५० रुपयांपर्यंत बचत होणार आहे.
महिना. नवीन जोडण्या
जानेवारी. ८,८०७
फेब्रुवारी. ८,९५९
मार्च. ११,२२४
एप्रिल. ११,५७४
मे. १४,००० हून अधिक
जून. १३,६९८
जुलै. ७,६४५ हून अधिक
एकूण. ७६,०२७
पीएनजी’कडे वळण्याची प्रमुख कारणे
१० ते १५ टक्के बचत – एलपीजीच्या तुलनेत दैनंदिन खर्च कमी.
सिलिंडरची चिंता नाही – बुकिंग, डिलिव्हरी आणि सिलिंडर संपण्याची भीती नाही.
सातत्यपूर्ण पुरवठा – पाइपलाइनद्वारे थेट घरात गॅस.
ऑनलाइन बिलाची सुविधा – घरबसल्या बिल भरण्याची सोय.
सुरक्षित पर्याय – सिलिंडर साठवण्याची गरज नसल्याने घरातील जागेची बचत.