आमची मते हवी असतील तर....; हिंगोलीच्या शाळेतून अभिजीत दिपकेंचा राज्य सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke School Thik Karo Abhiyan: “आमची मते हवी असतील तर, आधी आमच्या ग्रामीण भागातील सरकारी शाळा दुरुस्त करा, सुधाराव्या लागतील, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी जेवढी मेहनत घेत आहात, तेवढी राज्यातील सरकारी शाळांसाठीदेखील करा, शाळेत दर्जेदार शिक्षण द्या, शिक्षक उपलब्ध करून द्या,” अशा शब्दांत कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी इशारा दिला आहे.
15 ऑगस्ट 2026 रोजी सीजेपीचे स्कुल ठिक करो या मोहिमेला सुरवात झाली. या मोहिमेची सुरुवात अभिजीत दिपके यांनी त्यांची हिंगोली येथील गावच्या शाळेला भेटापासून झाली. या शाळेभेटीवेळी त्यांनी अनेक गोष्टींकडे सरकारसर संपूर्ण राज्याचेही लक्ष वेधले. त्यानंतर आजपासून त्यांनी पुन्हा एकदा हिंगोलीतील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. हिंगोलीतील लिंबाळा येथील MIDC शाळेला भेट दिली त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दारुच्या नशेत झोपले बोते. त्याचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल झाला. अभिजीत दिपके यांनी तातडीने या बाबत शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून माहिती देत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
BJP New National Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीममधून 2029च्या निवडणुकीची रणनीती
नशा करणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात गावातील नागरिकांनी पाच वेळी निवेदन देऊनही दारुड्या मुख्याध्यापकावर कारवाई का केली नाही, असा सवालही अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, जर शिक्षण अधिकाऱ्यांची मुले या शाळेत शिकत असती आणि एखादा दारुच्या बाटल्या घेऊन बसलेल्या मुख्याध्यापक असता तर त्यांनी तो सहन केला असता का, मग गावकऱ्यांनी तो का सहन करावा, गावकऱ्यांनी पाच वेळा दारुड्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्यासाठी मागणी केली असतानाही त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, आता आंदोलनाला बसल्यावरच जाग कशी आली, असे खडे सलावलही अभिजीत दिपकेंनी उपस्थित केले.
जर अधिकाऱ्यांची मुले खासगी शाळेत शिकतात. पण सरकारी शाळा संभाळण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांचीच आहे. त्यांचीही मुले या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली पाहिजेत. जेवढेही शिक्षणाधिकारी आहेत, त्यांच्या मुलांना सरकारी शाळेत टाकले पाहिजे. मग कळेल या गावकऱ्यांच्या मुलांना काय सहन करावे लागते, अशी टिकाही अभिजीत यांनी यावेळी केली.
Eknath Shinde Marathi Speech: मराठी ही सक्तीची नव्हे भक्तीची भाषा; एकनाथ शिंदेंचे विधान
देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे झाली असतानाही शाळेतील मुलांना आजही स्वच्छ पाणी आणि बसायला बेचेंस नाही, शौचालये नाही, ब्लॅक बोर्ड नावाचा प्रकार नाही, भिंतींना काळा रंग लावून त्यावर शिकवले जाते.असे असेल तुम्ही कसले विश्वगुरू, परदेशात जाऊन दावे करण्यापेक्षा मूलभूत आणि हक्काच्या मुद्द्यावर आधी काम करा. अशा शब्दांत त्यांनी सरकारला सुनावलें आहे.
सरकारी शाळा व्यवस्थित झाल्या तर काही खासगी शाळांचे व्यवसाय बंद पडतील. डोनेशन घेता येणार नाही आणि काही ट्रस्टच्या कारभारावरही परिणाम होईल. “यांना त्याचा त्रास आहे आणि हे सत्तेत बसलेले लोक आहेत,” असा आरोप त्यांनी केला. राजकीय रॅलीच्या वेळी ज्या पद्धतीने रस्ते स्वच्छ केले जातात, बॅनर लावले जातात आणि प्रशासन सक्रिय होते, त्याच पद्धतीने सरकारी शाळांचीही व्यवस्था सुधारली पाहिजे, असे दिपके यांनी म्हटले.
सरकारी शाळांमध्ये प्रामुख्याने गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाच्या सुविधांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधा, शिक्षकांची उपलब्धता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर सरकारने तातडीने लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. “तुम्ही आमच्या शाळा नीट करणार असाल, तरच आमचे मतदान तुम्हाला मिळेल,” असा इशारा अभिजीत दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच सत्ताधारी पक्षांच्या मित्रपक्षांना दिला.



