राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका कायम ठेवलीय. राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीपासून पोलीस अलर्ट मोडवर आहेत. मुंबईतील रस्त्यावर ठिकठिकाणी नाकाबंदी करुन प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येतेय.
मनसे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) जाहीर सभा घेतली होती. या सभेला अटी शर्तींसह परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला. औरंगाबादच्या सभेत त्यांनी मशिदींसमोरील भोंगा हटवला नाही तर दुप्पट आवाजानं हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. त्यासाठी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. आता याप्रकरणी पोलीस पुढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.