Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Politics: महापालिका स्वीकृत नगरसेवक निवडीत मोठा गैरप्रकार? मनसेचा भाजपवर गंभीर आरोप

तीन दिवसांत सविस्तर लेखी खुलासा न दिल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याबरोबरच जनआंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 26, 2026 | 12:35 PM
PMC, Pune News, Pune Municipal Corporation, Health Department

PMC, Pune News, Pune Municipal Corporation, Health Department

Follow Us
Follow Us:
  • पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवड प्रक्रियेत गैरप्रकार
  • भाजपच्या सात स्वीकृत सदस्यांपैकी दोन उमेदवारांचे अर्ज नियमांनुसार बाद
  • भाजपच्या बाद झालेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी
Pune Politics: पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवड प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. यासंदर्भात मनसेने महापालिका आयुक्तांकडे हरकत नोंदवली असून ठराविक उमेदवारांनाच पुन्हा संधी देणे चुकीचा असल्याचा आरोपही केला आहे.

Railway News : प्रवाशांना लुटणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा दणका; 121 जणांवर दंडात्मक कारवाई

मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना याविषयी निवेदन दिले आहे. स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियेत पक्षपातीपणा आणि नियमांचे उल्लंघन होत आहे. भाजपच्या सात स्वीकृत सदस्यांपैकी दोन उमेदवारांचे अर्ज नियमांनुसार बाद झाले होते. मात्र, त्याच उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांना निवड प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संभुस यांनी निवेदनात केला आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी इतर पात्र आणि अराजकीय उमेदवारांचे अर्ज कोणतीही लेखी कारणे न देता फेटाळण्यात आली आहे. यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होत असून, प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव स्पष्ट होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

मनसेने या प्रक्रियेत घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत समानतेचा अधिकार, भेदभावविरोधी तरतुदी आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचा भंग झाल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्वीकृत सदस्यांची निवड तज्ज्ञता, पारदर्शकता आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्याच्या विरुद्ध प्रक्रिया राबवली जात असल्याची टीका करण्यात आली आहे.

बारामतीत वीजपुरवठ्यावरून युगेंद्र पवार आक्रमक; सायंकाळी फोर्स लोडशेडिंग थांबवण्याची मागणी

दरम्यान, मनसेने काही ठोस मागण्या केल्या आहेत. यात ही निवड प्रक्रिया तात्काळ स्थगित करणे, निवडक उमेदवारांना दिलेली पुनर्संधी रद्द करणे, सर्व बाद केलेल्या उमेदवारांना लेखी कारणे देणे, संपूर्ण प्रक्रिया नव्याने आणि पारदर्शक पद्धतीने राबवणे, महिलांना किमान ५० टक्के प्रतिनिधित्व देणे आणि या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचा समावेश आहे.

तसेच, तीन दिवसांत सविस्तर लेखी खुलासा न दिल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याबरोबरच जनआंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. यावेळी मनसेचे हनुमंत मोहिते, अनिल पवार, महेश शिर्के, केदार कोडोलीकर, प्रशांत भोलागीर उपस्थित होते.

 

Web Title: Mns alleges corruption in pmc nominated corporator selection process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 12:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.