पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार होणार; अनेक आवश्यक सोयी-सुविधाही मिळणार
हे देखील वाचा : Pune Weather : पुणे शहरात तापमानात होतेय मोठी वाढ; कमाल तापमान 35 अंशांवर.
प्रवाशांकडून जेवणाच्या पदार्थांची विक्री करताना छापील किमतीपेक्षा (MRP) किंवा रेल्वेने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने विशेष तपासणी सुरु केली.
रेल्वे (Railway ) विभागाने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर स्थानक परिसरातील खाद्यपदार्थ विक्रीवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. चहा, पाणी, नाश्ता आणि जेवणाच्या पदार्थांसाठी निश्चित दरांपेक्षा अधिक पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तपासणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेमुळे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यास मदत होत आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ महिन्यात सर्वाधिक १८ प्रकरणे नोंदवली गेली असून त्यावर ६५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ऑक्टोबर २०२५ मध्येही १६ प्रकरणांमध्ये तब्बल ९६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. या कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये धाक निर्माण झाला असून प्रवाशांना दिलासा मिळत आहे.
याच वेळी मध्ये रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रवाशांकडून जादा पैसे आकारणे हा गंभीर नियमभंग असून अशा प्रकारांना अजिबात सहन केले जाणार नाही. प्रवाशांसोबत अशा घटना घडल्यास १३९ नंबरवर तक्रार नोंदवावी, त्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात येईल.
एप्रिल – २५. ९. ४५,०००
में – २५. १३. ५३,०००
जून. – २५. ८. २८,०००
जुलै. – २५ ११. ५८,०००
ऑगस्ट – २५. १६. ५१,०००
सप्टेंबर – २५. ०४. २५,०००
ऑक्टोबर – २५. १६. ९६,०००
नोव्हेंबर – २५. १०. ५,५००
डिसेंबर – २५. ०३. ११,०००
जानेवारी – २६. ०८. ३०,०००
फेब्रुवारी – २६. १८. ६५,०००
१२ मार्च पर्यंत. ०४. ८,०००
एकूण. १२१. ४,७५,५००
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






