कल्याण : मनसे आमदार राजू पाटील यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राज ठाकरे यांनी अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. अख्खा महाराष्ट्र एका बाजूला आणि कल्याण लोकसभा एका बाजुला असेल. श्रीकांत शिंदे मनसेचे उमेदवार आहेत असं समजून काम करायचं प्रत्येक वॉर्डमध्ये पक्ष दिसला पाहिजे, मतपेटीत मतं दिसलं पाहिजे, ते नाही झालं तर तुमचं आमच्यावर प्रेम नाही असं समजेन असं भावनिक आवाहन राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं. जी काही कामे असतील ती मला सांगा मी श्रीकांत शिंदे यांच्याकडून करून घेईन असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले. समोरच्या उमेदवाराची गॅरंटी नाही, त्यामुळे सहा तारखेनंतर निवडणूक होईल का? असा टोला देखील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना लगावला. पुढे बोलताना काम करणार नाही असं वागलात तर पक्ष विरोधी कृत्य असे समजून कारवाई केली जाईल असा इशारा देखील कार्यकर्त्यांना दिला.
मनसे शिवसेनेचा डीएनए एकच – खासदार श्रीकांत शिंदे
आम्ही दोन्ही पक्ष एकाच विचारधारांनी बांधले गेलो आहोत आणि एकाच विचारधाराने पूर्ण पक्ष चालत आहेत. राज ठाकरेंचे जे विचार आहेत तेच शिवसेनेचे विचार आहेत. म्हणून शिवसेना मनसेचा डीएनए एकच आहे. त्यामुळे आम्हाला लगेच एकत्र येता आलं पाहिजे. आमदार राजू पाटील आणि आम्ही एकमेकांचा विरोध करत होतो मात्र तो वैचारिक विरोध होता. मतभेद होते पण मनभेद नव्हते, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. आज १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात मनसेच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला मनसे आमदार राजू पाटील मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी काही लोकांनी विचारांशी स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी या विचारांचे फारकत घेतली म्हणून उठाव झाला आणि पुन्हा महायुतीचा सरकार बनलं असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांची काय परिस्थिती होणार ते येत्या चार तारखेला दिसेल, चार तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होईल. तुमच्याकडे सिम्पती नाही संपत्ती आहे असा टोला श्रीकांत शिंदें यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पूर्णपणे पाठिंबा दिला. ही युती जेव्हा झाली तेव्हा एका विचाराने झाली आणि त्या विचाराबरोबर जोडण्याचं काम हे राज ठाकरेंनी देखील केले. आता जेव्हा एका विचाराचे पक्ष एकत्र आले आहेत, मला वाटतं जसं काम या दोन वर्षात झालं अजून चांगलं काम भविष्यामध्ये होत राहील. ही युती तात्पुरती नाही तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी ही भविष्यात देखील राहील अशी कार्यकर्ता म्हणून अशी अपेक्षा असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी या वक्तव्यातून मनसे शिवसेना भाजपा युती ही विधानसभा आणि महापालिकेतही असेल असे संकेत दिले आहेत.
श्रीकांत शिंदेंसाठी राज ठाकरेंची 12 मे रोजी कल्याण लोकसभा मतदारसंघात सभा होणार : मनसे नेते बाळा नांदगावकर
कल्याण लोकसभेत महायुतीच्या उमेदवारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सभा घेणार आहेत. या संदर्भाची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी डोंबिवलीत दिली. आज १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात मनसेच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला नांदगावकर आणि शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कौतुक केलं, मुख्यमंत्री कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये देखील आपल्या वडिलांचे गुण आहेत असे सांगतानाच त्यांनी काही मध्ये मात्र गुण आले नसल्याचा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.
समोरच्या उमेदवाराची गॅरंटी नाही, त्यामुळे सहा तारखेनंतर निवडणूक होईल का? – राजू पाटील
मनसे आमदार राजू पाटील यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राज ठाकरे यांनी अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. अख्खा महाराष्ट्र एका बाजूला आणि कल्याण लोकसभा एका बाजुला असेल. श्रीकांत शिंदे मनसेचे उमेदवार आहेत असं समजून काम करायचं. प्रत्येक वॉर्डमध्ये पक्ष दिसला पाहिजे, मतपेटीत दिसलं पाहिजे, ते नाही झालं तुमचं आमच्यावर प्रेम नाही असं समजेन असं भावनिक आवाहन राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं. जी काही कामे असतील ती मला सांगा मी श्रीकांत शिंदे यांच्याकडून करून घेईन असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले. समोरच्या उमेदवाराची गॅरंटी नाही, त्यामुळे सहा तारखेनंतर निवडणूक होईल का असा टोला देखील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना लगावला. पुढे बोलताना काम करणार नाही असं वागलात तर पक्ष विरोधी कृत्य असे समजून कारवाई केली जाईल असा इशारा देखील कार्यकर्त्यांना दिला.