Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडगाव नगरपंचायतीचा विकास आराखडा तयार करताना भ्रष्टाचार? ३० कोटी रुपयांची झाला गैरव्यवहार

वडगाव मावळ नगरपंचायतीच्या विकास आऱाखड्यामध्ये ३० कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी केला.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 08, 2025 | 05:40 PM
MNS Rupesh Mhalaskar alleges corruption in Vadgaon Nagar Panchayat's development plan

MNS Rupesh Mhalaskar alleges corruption in Vadgaon Nagar Panchayat's development plan

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत शहराचा पुढील २० वर्षाचा नियोजित विकास साधण्यासाठी नुकताच प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र तो पूर्णतः मनमानी पद्धतीने व आर्थिक हित साधून बिल्डर धार्जिणा बनविण्यात आला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामध्ये स्थानिक अल्पभूधारक शेतकरी व वडगावातील नागरिकांवर मोठा अन्याय करण्यात आला असून विकास आराखड्याच्या माध्यमातून धनिकांशी हात मिळवणी करून मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात आला. यामध्ये साधारणतः ३० कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला असल्यास आरोप मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

पुढे बोलताना रुपेश म्हाळसकर म्हणाले की, “नगररचना विभागाकडून वडगाव नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आलेला प्रारूप विकास आराखडा सर्व नगर सदस्यांच्या समोर खोलण्यात आला. मात्र तो विकास आराखडा प्रसिद्ध करण्यापूर्वी करण्यात आलेले ९९ बदल हे कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता व त्यांना न सांगता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी परस्पर आर्थिक हित साधून केले व ८ ऑगस्ट २०२३ रोजी नगरसेवकांची ५ वर्षांची मुदत संपल्यानंतर २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सदर आराखडा प्रसिद्ध केला.” असा आरोप त्यांनी केला आहे.

वडगाव नगरपंचायत स्थापनेच्या पहिल्याच पंचवार्षिक काळात विकास आराखडा तयार करण्याची गरज नक्की कोणाला भासली यातून कोणाचे आर्थिक हित साधले. निवडणुकीमध्ये खर्च करण्यात आलेला पैसा विकास आराखड्याच्या माध्यमातून धनिकांशी हात मिळवणी करून मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात आला. यामध्ये साधारणतः ३० कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला असल्यास आरोप यावेळी त्यांनी केला ‌ वडगाव नगरपंचायत स्थापने दरम्यानच्या महाराष्ट्रातील इतर कोणत्याही नगरपंचायतीचा विकास आराखडा हा तयार झालेला नाही मग वडगावचा विकास आराखडा घाई घाई का करण्यात आला व बॉडी बरखास्तीच्या काळातच प्रसिद्ध करण्यात आला. मोनार्च एजन्सी यांनी अस्तित्वातील जमीन वापर नकाशा तयार केला असून सॅटेलाईट व प्रत्यक्ष स्थळ पाहणी सर्वे पूर्णतः चुकीचा केला आहे, असे देखील मत रुपेश म्हाळसकर यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

केतकर समिती पुढे एकूण ६५० हरकती व सूचना मांडण्यात आल्या. महागड्या गाड्यांमध्ये कोणकोण ये-जा करत होते, ज्या हॉटेल मध्ये मिटींग झाली त्याचे CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजे. त्या दरम्यान अनेक मोठ्या बिल्डरांनी पैसे देऊन आरक्षण बदलून घेतला असा गंभीर आरोप यावेळी केला

जैन स्थानकावर आरक्षण टाकून अपवित्र करण्याचे काम

१६ जून २०२५ सुधारित प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. एकूण हरकती पैकी फक्त ४३ आरक्षणात बदल करण्यात आले. पवित्र जैन स्थानकावरती काही लोकांनी आरक्षण टाकून त्यास अपवित्र करण्याचे काम केले.
पावन झालेल्या याच जागेवर जैन भागवती दीक्षाचा कार्यक्रम हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडला त्याच पुण्यभूमी वरती राजकीय सूडबुद्धीने व आर्थिक फायद्यासाठी आरक्षण टाकण्यात आले.

गावठाण हद्दीतील उप रस्त्यांची रुंदी कमी करण्यात यावी.

गणेश मंदिर ते शिवाजी चौक, रेल्वे हद्द ३० मीटर, दत्त मंदिर ते चिंचेचा गणपती वडगाव मुख्य रस्त्याची रुंदी कमी करणे वडगाव नगरपंचायत ते पंचायत समिती चौक १२ मीटर करण्यात यावा.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

भ्रष्टाचाराच्या पैशातून प्रतिष्ठान, राजकारण करण्याचा प्रयत्न

मतांच्या राजकारणासाठी जाणून बुजून काही ठिकाणी आरक्षण टाकून त्या ठिकाणचे आरक्षण काढून श्रेय लाटण्याचं काम काहीजण करत आहेत.पाच वर्षाच्या कार्यकाळातील व विकास आराखड्याच्या माध्यमातून मिळालेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून दादा व त्यांचे प्रतिष्ठान राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे.

विकास आराखड्याच्या मनमानी कारभाराविरुद्ध जन आंदोलन उभे करून कायदेशीर लढा दिला जाईल.
शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे होती. या प्रारुप विकास आराखड्‌यावर अनेक हरकती असल्यामुळे हा प्रारुप विकास आराखडा रद्द करून नव्याने पाहणी व सर्वेक्षण करून नवीन शहर प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात यावा अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने नगरपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा मनसेचे माजी तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी दिला आहे.

Web Title: Mns rupesh mhalaskar alleges corruption in vadgaon nagar panchayats development plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • maval news
  • Maval Politics
  • Wadgaon Maval

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.