मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे (Former Home Minister Anil Deshmukh’s judicial custody has been increased). मुंबईतील विशेष न्यायालयाने देशमुखांना आणखी १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे १८ ऑगस्टपर्यंत त्यांचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना खंडणी वसुली व मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अनिल देशमुख यांना मागील वर्षी अटक करण्यात आली असून ईडी आणि सीबीआय अशा दोन तपास यंत्रणा या प्रकरणात तपास करत आहेत. गुरुवारी त्यांची कोठडी संपत असल्याने न्यायालयाने त्यांच्या कोठडीत १४ दिवसांनी वाढ केली आहे.
[read_also content=”आंबडेकरांचे मौल्यवान साहित्य प्रकाशन प्रकरण: तज्ज्ञांच्या समितीला शुल्लक मानधन ; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले खडेबोल https://www.navarashtra.com/maharashtra/dr-babasaheb-amdekars-precious-literature-publication-case-fees-to-committee-of-experts-mumbai-high-court-harsh-words-to-the-state-government-nrvb-312150.html”]
दुसरीकडे, देशमुखांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्या याचिकेवर पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.