नांदणी: नांदणी येथील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थानी असलेल्या महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात हलवण्यात आल्यानंतर, कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाजात तीव्र नाराजीचा सूर आहे. ‘महादेवी’ला परत आणण्यासाठी नागरिकांनी जिओवर बहिषकर घालण्यास सुरुवात केली आहे. हजारो नागरिकांनी आपले सिम कार्ड जिओमधून दुसऱ्या कंपनीत पोर्ट करून घेतले आहे. दरम्यान भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी माधुरी हत्तीणीबाबत एक निवेदन दिले आहे.
धनंजय महाडिक यांचे ट्विट काय?
नांदणीच्या महादेवी हत्तीणीला पुन्हा मठात आणण्यासाठी केंद्रीय वनमंत्री नामदार @byadavbjp जी यांची भेट घेऊन निवेदन दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील लाडक्या महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
🐘 नांदणीच्या महादेवी हत्तीणीला पुन्हा मठात आणण्यासाठी केंद्रीय वनमंत्री नामदार @byadavbjp जी यांची भेट घेऊन निवेदन दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील लाडक्या महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. pic.twitter.com/V6jlbs1LMe
— Dhananjay Mahadik (@dbmahadik) July 31, 2025
काय म्हणाले केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव?
नांदणी मठाच्या माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. त्यातच आज खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वनमंत्र्यांना याबाबत निवदेन दिले. त्यावेळेस केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी लोकांच्या भावनेचा आदर राखत कायदेशीर बाजू पाहून सर्वप्रकारचे सहकार्य करू अशी ग्वाही दिली आहे.
नांदणी मठामध्ये हत्तीणीच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल, तसेच तिच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल असे खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
गावकऱ्यांनी अंबानींचं ‘JIO’ चं बॅन केलं
नांदणी येथील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थानी असलेल्या महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात हलवण्यात आल्यानंतर, कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाजात तीव्र नाराजीचा सूर आहे. या कृतीचा निषेध करण्यासाठी समाजाने एक अनोखा आणि शांततामय मार्ग निवडला आहे , ‘जिओ’ मोबाईल सेवा बहिष्कार आणि नंबर पोर्टिंग मोहीम धडाक्याने सुरू झाली आहे.
दरम्यान , काही समाज बांधवानी रोष व्यक्त करताना जिओ इंटरनेटचे कनेक्शन बंद करून किट ची तोडतोड केली. जैन धर्मीयांच्या मते, वनतारा प्रकल्पाचा थेट संबंध रिलायन्स उद्योग समूहाशी आहे, आणि त्यामुळेच ते जिओ ही कंपनी यासाठी अप्रत्यक्ष जबाबदार असल्याचे मानत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो जैन कुटुंबांनी आपले सध्याचे जिओ नंबर अन्य नेटवर्कवर पोर्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.