मुंबई : ठाकरे गटाच्या (Thackeray group) दोन नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यामुळे ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार व उपनेते राजन साळवी (Rajan Salvi) यांच्यावर बेकायदेशीर मालमत्ता बाळगल्याप्रकरणी कारवाई सुरु आहे. आज रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-corruption department) त्यांच्या घरावर छापा मारला. तर दुसरीकडे कोरोना काळातील कथित खिचडी वितरण गैरव्यवहार (Khichdi distribution malpractice) प्रकरणामुळे सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना ईडीने अटक केली. यावर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ‘जर शिवसेना सोडून शिंदे गटात आले नाहीत तर तुमच्यावर एजन्सी मार्फत कारवाई केली जाईल अशाप्रकारचे धमकीचे निरोप येत असल्याचे’ आरोप संजय राऊत यांनी केले आहेत.
आमच्या दोन्ही निष्ठावंत नेत्यांवर दबाव आहे. रवींद्र वायकर यांच्यावर देखील प्रचंड दबाव आहे. जर शिवसेना सोडून शिंदे गटात आले नाहीत तर तुमच्यावर एजन्सी मार्फत कारवाई केली जाईल अशाप्रकारे धमकी वादक निरोप येत आहेत. राजकीय सूडाने कारवाई करत असाल तर या सर्व लढण्याची आमची ताकद आहे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
खिचडी वितरण गैरव्यवहारामुळे सुरज चव्हाण यांना अटक करण्यात आली. या प्रकरणावर संजय राऊत यांनी भाष्य केले. मुंबई महानगरपालिकेने कोवीड काळात उत्तम काम केले तो काम होते. संपूर्ण काळामध्ये शिवसेनेचे किंवा इतर सामाजिक संस्थांच्या लोकांनी कोविड सेंटर चालवली त्या काळामध्ये गोरगरिबांना स्थलांतर कामगारांसाठी खिचडी वाटप झाले. मात्र तरीही अनेक खोटे प्रकरण, खोटे साक्षी-पुरावे उभे करून ही प्रकरणे निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावेळी 138 लोकांना खिचडी वाटपाचे काम दिले मात्र, या किती लोकांच्या चौकशी झाल्या किती लोकांवर ते गुन्हे झाले हे देखील समोर आणावे. किमान 38 अशा कंपन्या आहेत त्यांनी खिचडीचा वाटप केली नाही पण मुंबई महानगरपालिका करून कोट्यावधी रुपयाचे बिले उकळली. हे सगळे आणि त्यांचे मोरके हे शिंदे गटांमध्ये व बीजेपीमध्ये आहेत. हे पैसे मिंदे गटात गेले त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. सुरज चव्हाणांच्या जवळ काम करणारे लोक मिंदे गटात आहेत म्हणून त्यांना सोडले. पण दिवस बदलणार आहेत आज खोट्या कारवाई करणाऱ्यांच्या हातामध्ये बेड्या पडल्याशिवाय राहणार नाही. असा घणाघात संजय राऊत यांनी खिचकी घोटाळा प्रकरणावर केला.
ॲम्बुलन्स घोटाळ्याबाबत एजन्सी गप्प का?
महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर ॲम्बुलन्स घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. यावरुन राऊतांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले असून जहरी टीका केली. राऊत म्हणाले, ॲम्बुलन्स घोटाळातील पैसा नक्की महाराष्ट्रात व गुजरातमध्ये नक्की कुठे जात आहे. 8 हजार कोटींचा घोटाळा समोर आला आहे मात्र इडी, सीबीआय, युवोडब्ल्यू काय करत आहे? हे सरकार गप्प आहे. त्यांचे एजंट गप्प आहे. एजन्सी गप्प आहे. आमदारांना गप्प बसण्यासाठी किंवा विधानसभा अध्यक्ष यांना आमच्या विरोधात निर्णय देण्यासाठी या पैशांचा वापर केले जातो आहे का ? ते कोविड घोटाळा म्हणणारे, खिचडी घोटाळा म्हणणारे प्रश्न विचारणारे कुठे गेले ? तानाजी सावंत भरती प्रकरणात शेकडो कोटींच्या भ्रष्टाचार मी बाहेर काढला तो एजन्सीला दिसत नाही का? राजकीय सूडाने तुम्ही कारवाई करत असाल या सर्व लढण्याची संघर्ष करण्याची आमची ताकद आहे. असे प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी ईडी, सीबीआय व युवोडब्ल्यू या एजन्सींना जबाब विचारला.