आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. निवडणुकीमध्ये महायुती एकतर्फी विजय झाला तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यामुळे मविआमध्ये अंतर्गत राजकारण सुरु झाले आहे. दरम्यान, होळी सणाच्या शुभेच्छा देताना कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खास ऑफर दिली. यावरुन आता राजकारण तापले आहे. यावर आता महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्या राजकीय प्रस्तावावर आणि नव्या युतीवर भाष्य केले. “नाना पटोले हे कॉंग्रेसमधील महत्त्वाचे आणि जेष्ठ नेते आहेत. तसेच ते आमचे सहकारी आहेत. त्यांनी विधानसभेचे अध्यक्षपद भुषवलं आहे. राजकारणामध्ये काहीही अशक्य नसतं. एवढंच मी सांगू शकतो. 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. असं कोणाला वाटलं होतं का? पुन्हा अडीच वर्षांनी असं अर्धेवट घटनाबाह्य सरकार सत्तेमध्ये येईल असे कोणाला वाटलं होतं का? त्यानंतर 2024 साली देवेंद्र फडणवीस यांना इतकं मोठ बहुमत मिळेल असं कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का? त्यामुळे राजकारण आहे. राजकारणामध्ये सर्व शक्यता शक्य असतात,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “राजकारणामध्ये सकारात्मक विचार करुन पुढच पाऊल टाकावं लागत असा आमचा विचार आहे. आता आमच्या नाना पटोले यांनी कोणाला ऑफर दिली असेल आणि त्यांनी ती स्वीकारली तर आम्ही नक्की नाना पटोलेंसोबत चर्चा करु. ज्या प्रकारचं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. आणि त्या गोष्टी आम्हाला सहन कराव्या लागत आहेत. आम्ही रुसवे फुगवे आणि आदळ आपट बघत बघतो ती उघडपणे दिसत आहे. नाना पटोले यांनी लवकर भांड वाजवलं. त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं,” असं स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्धव ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना यांची भविष्यामध्ये युती होण्याची शक्यता आहे का? असा सवाल माध्यमांनी विचारला. यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, “तुमचा प्रश्न चुकीचा आहे. देशाचा आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत. मी एवढंच सांगतो पुढच्या वर्षामध्ये देशाचे राजकारण बदलणार आहे. तुम्ही विचाराल कसं तर मी थांबा एवढंच म्हणेल. एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी संबंध काय? त्यांचा भवगव्या रंगाशी काडीमात्र संबंध नाही,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.