
Kolhapur Shahu Mill News, Textile Industry Maharashtra, New Palace Kolhapur Meeting
मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत वस्त्रोद्योगमंत्र्यांनी शाहू मिलच्या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याबद्दल महाराजांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.सरकारकडून या महत्त्वाच्या विषयाची दखल घेतली जात नसल्याने आता ठोस पाठपुरावा आणि वातावरण निर्मितीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी तातडीने एक ‘वर्किंग कमिटी’ स्थापन करण्याची सूचना त्यांनी उपस्थितांना दिली.
स्थानिक निवडणुकानंतर काँग्रेसमध्ये ‘इन्कमिंग’ सुरु; ‘या’ पक्षातील कार्यकर्त्यांनी केला प्रवेश
या लढ्यात जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे निधीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. शाहू मिल सुरू करण्यासंदर्भातील दोन महत्त्वपूर्ण ठराव प्रशासनासह सरकारला पाठवण्यात येणार असून, लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीमुळे शाहू मिलच्या पुनरुज्जीवनाच्या चळवळीला आता नवी धार मिळाली आहे.
बाबा इंदुलकर यांनी स्वागत केले. बाबा पार्ट यांनी प्रास्ताविक केले. मुंबईत झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे पालकमंत्र्यांना सांगून नव्याने बैठक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. अनिल कदम यांनी मंत्रिमंडळाने आराखडा मंजूर करावा, त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, हा आराखडा आपण मुख्यमंत्र्यासमोर मांडू, असा प्रस्ताव मांडला. महेश जाधव यांनी साडेतीन हजार कामगार शाहू मिलमध्ये काम करत होते. आता पुन्हा ती मिल लवकर सुरू करावी, यासाठी प्रयत्न करावेत. रवी जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, डी. जी. भास्कर यांनी शाहू मिल सुरू झाली पाहिजे. त्यासाठी संघर्षांची तयारी ठेवा.
राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यात संवाद ठेवून प्रश्नाची सोडवणूक करावी, असे सांगितले. बाबा पार्ट यांनी आंदोलन आपण करूच, पण त्यासाठी सरकारशी समन्वय, अन् संवादही ठेवायला हवा. शाहू मिल सुरू करणे, हाच विचार घेऊन पुढे जावे, असे सांगितले. यावेळी आर. के. पोवार दिलीप देसाई, उदय गायकवाड, विजय देवणे, रवी जाधव, कॉ. दिलीप पोवार, रघुनाथ कांबळे, डी. जी. भास्कर, सतीशचंद्र कांबळे, डॉ. रवींद मोरे, संभाजीराव जगदाळे, अनील कदम, राजू जाधव, डॉ. दिलशाद मुजावर, फिरोजखान उस्ताद, शुभम शिरहट्टी, किरण कवठेकर शिवाजीराव कवाळे आदी उपस्थिती होती.