Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Live in Relationship: “समाजाला मान्य नाही म्हणून त्यांचा अधिकार…”; ‘या’ प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय

व्यक्तिगत रिलेशनशिपमध्ये व्यक्तिगत आवडीनुसार सन्मानाने जगण्याच्या त्यांच्या अधिकाराचा एक भाग आहे. समाजाला मान्य नाही म्हणून त्यांचा अधिकार नाकारता येणार नाही, असे हायकोर्ट म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 18, 2024 | 04:21 PM
Live in Relationship: “समाजाला मान्य नाही म्हणून त्यांचा अधिकार…”; ‘या’ प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

Mumbai High Court: मुंबई हायकोर्टाने लिव्ह इन रिलेशनशिपबाबत एक महत्वाचा निर्णय दिला आहे. लिव्ह इन रिलेशन हा जोडप्याचा अधिकार आहे. याबाबत एका प्रकरणाची सुनावणी हायकोर्टात सुरू होती. यावर कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. मुलाला आणि मुलीला एकत्रित लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे असेल तर त्यांना थांबवता येणार नाही. एका हिंदू मुलाला आणि मुस्लिम मुलीला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे तर त्यांना रोखता येणार नाही असा महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

व्यक्तिगत रिलेशनशिपमध्ये व्यक्तिगत आवडीनुसार सन्मानाने जगण्याच्या त्यांच्या अधिकाराचा एक भाग आहे. समाजाला मान्य नाही म्हणून त्यांचा अधिकार नाकारता येणार नाही. संविधानाने त्यांना तो अधिकार दिला आहे, असे सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाने दिला आहे. मुंबई हायकोर्टात दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

हायकोर्टाने आपल्या सुनावणीत सांगितले, ‘आमच्यासमोर दोन सज्ञान व्यक्ती उभ्या आहेत. त्यांनी पूर्णपणे स्वतःच्या विचाराने जोडीदार म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोणताही कायदा त्यांना रोखू शकत नाही. त्यामुळे आम्ही मुलीला तात्काळ शेलटर होममधून सोडण्याचे निर्देश देतो. आम्हाला मुलीच्या आई-वडिलांच्या चिंता समजतात. त्यांना तीला चांगले भविष्य द्यायचे आहे. मात्र मुलगी सज्ञान आहे. तिने तीची पसंत ठरवली आहे. आमच्या दृष्टीने तीला तिचा निर्णय घेण्याचे स्वतंत्र्य आहे. त्यापासून रोखता येणार नाही. कायदेशीररित्या ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. ‘ एका मुलाने याचिका दाखल करत त्याद्वारे पोलीस संरक्षण मागितले होते. मात्र हायकोर्टाने त्याला नकार दिला आहे.

मशिदीमध्ये ‘जय श्री राम’च्या घोषणा देणे अपराध कसा?

सुप्रीम कोर्टात कर्नाटकमधील एका प्रकरणावर सुनावणी करताना मशिदीमध्ये ‘जय श्री राम’च्या घोषणा देणे हा अपराध कसा होऊ शकतो असा सवाल याचिकाकर्त्याला विचारला आहे. मशिदीमध्ये जय श्री रामच्या घोषणा दिल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्याच्या प्रकरणावरून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी हा सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला. नेमके हे प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. हे प्रकरण कर्नाटक राज्यातील आहे.

मशिदीमध्ये जय श्रीरामच्या घोषण दिल्याने धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी कर्नाटक हायकोर्टमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान त्यानंतर हा खटला रद्द करण्याचा निर्णय हायकोर्टाने घेतला. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करताना कर्नाटक सरकारकडे उत्तर मागितले आहे. तसेच सरकारला नोटीस बजावण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा: मशिदीमध्ये ‘जय श्री राम’च्या घोषणा देणे अपराध कसा? ‘SC’ चा याचिकाकर्त्याला सवाल; प्रकरण वाचाच…

हे संपूर्ण प्रकरण कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आहे. या ठिकाणी दोन लोकांनी मशिदीत जाऊन ‘जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण कर्नाटक हायकोर्टात पोहोचले होते. हायकोर्टाने हा खटला रद्द केला. त्यानंतर हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाला आव्हान देण्यात आले होते.  मशिदीत ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखवत नाहीत असा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला होता. दरम्यान यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

 

Web Title: Mumbai high court give decision a hindu boy and muslim girl stay live in relationship by law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 03:58 PM

Topics:  

  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

कोल्हापुरातील रस्त्याचा विषय थेट उच्च न्यायालयात; कोर्टाने नोटीसच केली जारी
1

कोल्हापुरातील रस्त्याचा विषय थेट उच्च न्यायालयात; कोर्टाने नोटीसच केली जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.