MaratMaratha Reservation: "3 वाजेपर्यंत सर्व सुरळीत करा, अन्यथा..."; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हायकोर्टाने दिले कारवाईचे संकेतha Reservation: "... अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू"; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हायकोर्टाने सरकारला झापले
हायकोर्टाचे आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश
हायकोर्टाने सरकारला झापले
दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार
Manoj Jarange Patil: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाविरुद्ध हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. आज देखील हायकोर्टात 3 वाजता सुनावणी होणार आहे. दरम्यान 3 वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आंदोलक आता के भूमिका घेणार हे पहावे लगणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत हायकोर्टात सुनावणी पार पडली. दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व सुरळीत करावे. तीन वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून आढावा घेऊ, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. तसेच 3 वाजेपर्यंत सुरळीत न झाल्यास अवमान केल्याबद्दल कारवाई करू असा स्पष्ट इशारा मुंबई हायकोर्टाने दिला आहे.
काल देखील मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली होती. कालच्या सुनावणीत देखील राज्य सरकार आणि आंदोलनकर्त्यांवर कोर्टाने ताशेरे ओढले होते. कोर्टाने आझाद मैदान सोडून सगळी मुंबई रिकामी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. दरम्यान आज पुन्हा एकदा हायकोर्टात मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर ऊनवणी पार पडली. मराठा समाजाची बाजू ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी मांडली.
मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही : जरांगे पाटील
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी उपोषण करण्यात आले आहे. त्यानंतर आताही त्यांनी उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा हा आजचा पाचवा दिवस आहे. याचदरम्यान आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस दिली आहे. मात्र, या नोटिशीनंतरही जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. ‘मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही’, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
‘मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही’; पोलिसांच्या नोटिशीनंतर मनोज जरांगेंची भूमिका
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होताच मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. आंदोलनासाठी न्यायालय आणि पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे जरांगे पाटील यांना दिलेल्या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून मैदान तात्काळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.