Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे चहाप्रेमी शहर; बदलत्या ट्रेंड्समुळे पीच टी, कोम्बुचा आणि वेलनेस टीची वाढती क्रेझ

मुंबईने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक चहा सेवन करणारे शहर म्हणून आपले स्थान कायम राखल्याचे इन्स्टामार्टच्या ‘टी ट्रेंड्स’ अहवालातून समोर आले आहे. पारंपरिक ब्लॅक टी आणि अद्रक चायसोबतच पीच टी, कोम्बुचा, काश्मिरी कहवा आणि विविध मसाला ब्लेंड्सची लोकप्रियताही झपाट्याने वाढत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 23, 2026 | 05:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

कटिंग चहा ही मुंबईची ओळख असली, तरी आता शहरातील चहाप्रेमींच्या आवडीनिवडींमध्ये मोठा बदल होताना दिसत आहे. इन्स्टामार्टच्या ताज्या ‘टी ट्रेंड्स’ अहवालानुसार, मुंबईने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक चहा सेवन करणारे शहर म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. पारंपरिक ब्लॅक टी आणि अद्रक चायची लोकप्रियता कायम असली, तरी पीच टी, कोम्बुचा, काश्मिरी कहवा आणि विविध मसाला ब्लेंड्सकडे ग्राहकांचा वाढता कल दिसून येत आहे.

‘किंग एडवर्ड हा कसाब सारखा…’; विधानपरिषदेत Mangal Prabhat Lodha विरोधकांवर भडकले

जून २०२५ ते जून २०२६ या कालावधीत देशातील १३० हून अधिक शहरांमधील ऑर्डर्सच्या विश्लेषणातून तयार करण्यात आलेल्या या अहवालात चहाच्या बदलत्या सवयींचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, रेडी-टू-ड्रिंक (RTD) चहा ही सर्वात वेगाने वाढणारी श्रेणी ठरली असून, वर्षागणिक तब्बल १०९ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे तयार चहा थेट खरेदी करण्याकडे ग्राहकांचा वाढता ओढा असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

देशभरात चहामध्ये नवीन फ्लेवर्स आणि आरोग्यदायी पर्यायांना मोठी पसंती मिळत आहे. त्यामध्ये पीच टीने सर्वाधिक झेप घेत तब्बल ६२ पट वाढ नोंदवली असून, तो भारतातील सर्वात वेगाने वाढणारा चहाचा फ्लेवर ठरला आहे. याशिवाय ब्लू पी टी, कोम्बुचा, तुळस चहा आणि ग्रीन टी यांच्याही मागणीत सातत्याने वाढ होत आहे. वेलनेस-केंद्रित पेयांबद्दल वाढती जागरूकता आणि जागतिक खाद्यसंस्कृतीचा प्रभाव यामागे महत्त्वाची कारणे मानली जात आहेत. वेलनेस टी श्रेणीतही लक्षणीय वाढ झाली आहे. तुळस चहा, ग्रीन टी आणि ब्लू पी टी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे या विभागात २६ टक्के वार्षिक वाढ नोंदवण्यात आली. आरोग्याची काळजी घेणारे ग्राहक आता चव आणि पोषण यांचा समतोल साधणाऱ्या पर्यायांना अधिक पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे.

मात्र या सर्व प्रयोगांनंतरही पारंपरिक चहाचे महत्त्व अजूनही अबाधित आहे. राष्ट्रीय स्तरावर अद्रक चाय हा सर्वाधिक पसंतीचा चहा ठरला असून, त्यानंतर ब्लॅक टी, इलायची चहा, ग्रीन टी आणि मसाला चहा यांचा क्रम लागतो. विशेष म्हणजे, देशातील प्रमुख शहरांमध्ये अद्रक चाय हा सर्वाधिक ऑर्डर केला जाणारा प्रकार असल्याने भारतीयांच्या चहाच्या संस्कृतीत त्याचे स्थान कायम असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. शहरांच्या क्रमवारीत बेंगळुरूने सर्वाधिक चहा सेवन करणारे शहर म्हणून अव्वल स्थान मिळवले असून, मुंबई दुसऱ्या तर हैदराबाद तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, वाढीच्या वेगाच्या बाबतीत भुवनेश्वर आघाडीवर असून तेथे चहाच्या ऑर्डर्समध्ये ६४ टक्के वार्षिक वाढ झाली आहे. तिरुवनंतपुरम आणि कोची ही शहरेही या यादीत वेगाने पुढे येत आहेत.

अवैध मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचे थेट परमीट रद्द होणार; परिवहन मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

आठवड्याच्या दिवसांमध्ये रविवार हा चहा खरेदीसाठी सर्वाधिक लोकप्रिय दिवस ठरला आहे. त्यानंतर शनिवार आणि गुरुवारचा क्रम लागतो. यावरून सुट्टीच्या दिवशी घरबसल्या चहा मागवण्याची सवय ग्राहकांमध्ये वाढत असल्याचे दिसून येते. एकूणच, मुंबईसह देशभरातील चहाप्रेमी पारंपरिक चवी जपत नव्या फ्लेवर्स आणि सोयीस्कर पर्यायांचा स्वीकार करत आहेत. त्यामुळे भारतीय चहासंस्कृतीत नावीन्य आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळत असून, आगामी काळातही या ट्रेंड्समध्ये आणखी विविधता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Mumbai is indias second largest city for tea lovers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • tea

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.