मंगल प्रभात लोढा (फोटो- सोशल मीडिया)
ब्रिटिश सत्ताकाळ हा भारताच्या शोषणाचा काळ
मंगलप्रभात लोढा यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर
किंग एडवर्डने भारताला गुलाम केले होते – लोढा
मुंबई: किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालय नामांतरासंदर्भात आज विधानपरिषदेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. लोढा यांनी स्पष्टपणे नमूद केले की, ब्रिटिश सत्ताकाळ हा भारताच्या शोषणाचा काळ होता. “किंग एडवर्ड हा भारतासाठी गौरवाचा विषय नसून, तो गुलामगिरीच्या काळाचे प्रतीक आहे,”.
मंगल प्रभात लोढा म्हणाले, “किंग एडवर्डने भारताला गुलाम केले होते आणि देशाची संपत्ती लुटून इंग्लंडला नेली. किंग एडवर्डने पैसे दिले, ही दिशाभूल करणारी बाब आहे,” या संदर्भात त्यांनी कठोर शब्दांत टीका करत म्हटले की, “लाखो भारतीयांच्या मृत्यूला जबाबदार हा किंग एडवर्ड कसाब सारखा माणूस होता. किंग एडवर्डच्या नावाचे समर्थन करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. KEM च्या नामांतरासाठी आम्ही ३ नावांचे पर्याय दिले असून सरकार त्याबाबत योग्य निर्णय घेईल. सुचवलेल्या तिन्ही नावाच्या पर्यायापैकी कोणताही पर्याय निवडल्यास त्या नावाचे संक्षिप्त रूप हे KEM हेच असेल हे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.
PM-VBRY: पंतप्रधान मोदींच्या हस्ते २४०० कोटींचे वितरण; कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढांची उपस्थिती
ट्रम्प टॉवरचे नाव बदलण्याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले की, ट्रम्पचे नाव हे केवळ व्यावसायिक भागीदारीमुळे देण्यात आले असून त्याचा कोणत्याही प्रकारच्या गौरवाशी संबंध नाही. दरम्यान, विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या व्यवसायावर प्रश्न उपस्थित केला. यावर प्रत्युत्तर देताना लोढा यांनी “माझा व्यवसाय संपूर्ण जगाला माहित आहे; उत्पन्नाचा स्रोत ज्ञात आहे. मात्र तुमचा व्यवसाय काय आहे हे आम्हाला माहिती नाही. तरीही तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या गाडीतून फिरता, असा उलट प्रश्न केला. ”
पंतप्रधान मोदींच्या हस्ते २४०० कोटींचे वितरण
प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) अंतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे सुमारे ₹2,400 कोटींच्या प्रोत्साहन रकमेचे वितरण करण्यात आले. PM-VBRY अंतर्गत हे प्रोत्साहन वितरण 15 लाखांहून अधिक व्यक्तींसाठी अतिरिक्त रोजगाराला चालना देण्यास मदत करेल, अशी अपेक्षा आहे.
देशव्यापी जनजागृती आणि लाभवितरण मोहिमेचा भाग म्हणून देशभरातील 200 ठिकाणी समांतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), प्रादेशिक कार्यालय, मुंबई (दादर) यांच्या वतीने वरळी येथील एचएसएनसी विद्यापीठामध्ये प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना जनजागृती व लाभार्थी वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.






