इंजिनमधील बिघाडामुळे ट्रेन ट्रकवर अडकली! कल्याणकडील रेल्वे वाहतूक ठप्प
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलचं वेळापत्रक आता कोलमडणार आहे. कारण पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहावी मार्गिका तयार करण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर आज 27 ऑगस्ट ते 6 ऑक्टोबर या कालावधीत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितच मुंबईकरांचे रोजचे वेळापत्रक कोलमडणार आहे. मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागणार आहे.
हेदेखील वाचा- TISS विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; अपार्टमेंटमध्ये सापडला मृतदेह, पोलीस तपास सुरु
वांद्रे टर्मिनस-बोरिवलीदरम्यान पाचवी मार्गिका आणि खार रोड-गोरेगावदरम्यान सहावी मार्गिका यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. मात्र आता रेल्वे प्रशासनाने गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहावी मार्गिका टाकण्याचे काम हाती घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम रेल्वे मार्गावर 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात गोरेगाव कांदिवलीदरम्यान 4.5 किमी लांबीच्या सहाव्या मार्गाचे हाती घेतलं जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या या मेगाब्लॉक दरम्यान जवळपास 66 ते 700 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्या प्रवसाचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे.
35 दिवसांचा हा मेगाब्लॉक जरी 6 ऑक्टोबरला संपणार असला तरी देखील गणेशोत्सव कालावधीत हे काम थांबिण्यात येणार आहे. 11 ते 17 सप्टेंबर या कालावधीत गणेशभक्तांना दिलासा देत मार्गिका टाकण्याचे काम थांबविले जाणार आहे, असं रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे. मात्र 17 सप्टेंबरनंतर पुन्हा मार्गिकेच्या कामाला सुरुवात होणार आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये 130-140 गाड्या रद्द करण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान मुंबईकरांचे प्रचंड हाल होणार आहेत. मात्र नवीन मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना तेवढाच फायदा देखील होणार आहे.
हेदेखील वाचा- उरण द्रोणागिरी सेक्टर 51 देव कृपा चौकात हिट अँण्ड रनचा थरार; नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर
नवीन मार्गिकेमुळे उपनगरी रेल्वे मार्ग आणि मुख्य मार्गावरील रहदारी काही प्रमाणात कमी होईल, लोकल गाड्यांचा वक्तशीरपणात सुधारण्यास मदत होऊ शकते, वांद्रे टर्मिनसवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेससाठी दोन मार्गिका उपलब्ध होतील, लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका मिळणार आहे आणि जास्त गाड्या चालवण्यासाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध होऊ शतकतील.
या मेगाल्बॉकचे सविस्तर नियोजन रेल्वे प्रशासनाने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केलं आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मेगाब्लॉक कालावधीत 5 व्या, 12 व्या, 16 व्या, 23 व्या आणि 30 व्या दिवशी 10 तासांचे ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या नवीन मार्गिकेमुळे लोकलवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या या मेगाब्लॉक दरम्यान जवळपास 66 ते 700 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. गोरेगाव कांदिवलीदरम्यान टाकल्या जाणाऱ्या सहाव्या मार्गिकेमुळे उपनगरी रेल्वे मार्ग आणि मुख्य मार्गावरील रहदारी काही प्रमाणात कमी होऊन लोकल गाड्यांचा वक्तशीरपणात सुधारण्यास मदत होणार आहे.