उरण द्रोणागिरी सेक्टर 51 देव कृपा चौकात हिट अँण्ड रनचा थरार; नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर
उरणमधील द्रोणागिरी सेक्टर ५१ देव कृपा चौकात हिट अँड रनची घटना घडल्याचं समोर आलं आहे. काल दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास द्रोणागिरी देवकृपा बसस्टँड देवकृपा चौकात, उरण पनवेल रोडवर एकविरा पान पट्टी समोर ही घटना घडली. उरण कडून येणाऱ्या भरधाव होंडा सिटीने ४ ते ५ जणांना उडवलं आणि त्यानंतर समीर गॅरेज समोर उभ्या असलेल्या ७ ते ८ मोटार सायकलला धडक दिली. यानंतर त्यातीलच एका स्कुटीवर उभ्या असलेल्या व्यक्तिला उडवलं आणि त्यानंतर एका हातगाडीला देखील उडवल्याचं समोर आलं आहे.
हेदेखील वाचा- तुझी अवस्थासुध्दा कोलकाता तरूणीसारखी… अल्पवयीन मुलाची महिला डॉक्टरला धमकी, मुंबईतील घटना
या गाडीला हरियाणाची पासिंग होती. या घटनेमुळे सर्वत्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. ही सर्व घटना सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हिट अँण्ड रनचा थरार येथील प्रवासी नागरिकांना व द्रोणागिरी रहिवासियांना अनुभवाला मिळाला आहे. मात्र या घटनेमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास द्रोणागिरी देवकृपा बसस्टँड देवकृपा चौकात, उरण पनवेल रोडवर एकविरा पान पट्टी समोर उरणकडून येणाऱ्या हरियाणाची पासिंग असलेल्या भरधाव होंडा सिटीने ४ ते ५ जणांना उडवल्याची घटना घडली आहे. यानंतर त्या गाडीने समीर गॅरेज समोर उभ्या असलेल्या ७ ते ८ मोटार सायकल तसेच त्यातीलच एका स्कुटीवर उभ्या असलेल्या व्यक्तीला उडवलं आणि यानंतर एका हातगाडीलाही उडविला आहे. हिट अँण्ड रनचा थरार येथील प्रवासी नागरिकांना व द्रोणागिरी रहिवासियांना अनुभवास मिळाला आहे.
हेदेखील वाचा- राज ठाकरे उद्या बदलापूरकरांच्या भेटीला येणार; बदलापूरमधील घटनेबाबत नागरिकांशी संवाद साधणार
उरण तालुक्यात सिडकोच्या अखत्यारीत असलेल्या द्रोणागिरी नोडचे झालेले विस्तारीकरण, वाढती लोकसंख्या त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला दुतर्फा लावण्यात आलेल्या हातगाड्या, त्याचप्रमाणे भर रस्त्यावर भरणारा आठवडा बाजार हे सारे कुणाच्या परवानगी ने किंवा कुणाच्या मर्जीने चालत आहे हा एक अभ्यासाचा विषय आहे.
परंतु सिडकोने द्रोणागिरी नोडचे विस्तारीकरण केले आहे रस्ते नाले बांधले आहेत, पण जीथे चार रस्ते जोडले आहेत त्या ठिकाणी अजूनही सिग्नलची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे दिवसभर वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात होत असते. यामध्ये वाहतूकीच्या नियमांची पायमल्ली होत आहे. कुणीही दुचाकी चारचाकी चालक कुठूनही येत आहे. आणि अशावेळी तंद्रीत असणाऱ्या वाहन चालकांकडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत द्रोणागिरी नोड विकसित करण्यात आले आहे मात्र अजूनही नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.