धक्कादायक! मुंबई विमानतळावर बॅगेत सापडले ४७ विषारी साप, विमानतळावर खळबळ
मुंबई विमानतळावरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४७ विषारी साप आढळून आले आहेत. सीमाशुल्क (कस्टम) विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला अकटक केली असून तो भारतीय नागरिक आहे. थायलंडवरून परतत असताना अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत (वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्ट) हे साप जप्त करण्यात आले आहेत.
साखरपुड्यासाठी गेलेल्या चुलता-पुतण्यावर काळाचा घाला; भीषण अपघातात मृत्यू
मात्र या या प्रवाशाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. त्याची सध्या तुरुगांत रवानगी करण्यात आली केली .कस्टम अधिकाऱ्यांनी एक्सवर एका डिशमध्ये रंगीबेरंगी सापांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. 44 इंडोनेशियन पिट साप, 3 स्पायडर-टेल्ड हॉर्न्ड सापआणि 5 एशियन लीफ कासवं असल्यांच, या पोस्टमध्ये अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मात्र हे साप कुठून आले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
भारतात प्राण्यांची आयात करणं बेकायदेशीर नाही, पण वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार काही विशिष्ट प्रजातींच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी किंवा सरकारकडून संरक्षित करण्यात आलेल्या प्राणांचा समावेश आहे. त्यामुळे विदेशातून भारतात कोणत्याही वन्य प्राण्याची आयात करताना प्रवाशाने संबंधित विभागाची परवानगी आणि परवाने घेणं बंधनकारक आहे.
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत मिळून केली चार वर्षांच्या मुलीची हत्या, मृतदेह कपाटात ठेवला अन्…
दरम्यान जानेवारी महिन्यातही अशीच घटना घडली होती. भारतीय अधिकाऱ्यांनी दिल्ली विमानतळावर एका कॅनेडियन नागरिकाला अटक केली होती. त्याच्याजवर मगरीची कवटी आढळली होती. त्यानंतर महिनाभरातच पाच सियामांग गिबन्स घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली होती. सियामांग गिबन्स इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडच्या जंगलात आढळणारी छोटी माकडं आहेत. या माकडांचा समावेश इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या नामशेष होण्याच्या मार्गावरील वन्यजीवांच्या यादीत आहे. ही माकडं त्या प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमध्ये एका प्लास्टिक क्रेटमध्ये लपवण्यात आली होती. तर नोव्हेंबर महिन्यात बँकॉकहून परतणाऱ्या दोन प्रवाशांकडे परदेशी प्रजातीची 12 कासवं सापडली होती.