
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव प्रभाकर ओझा असे आहे. तो त्याच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीच्या पोईसर परिसरात राहत होता. तो मुंबईच्या MIDC परिसरातील एका ज्वेलरी शॉपमध्ये सिक्योरिटी गार्ड म्हणून काम करत होता. त्याच्याकडे वैध लायसन्सी रिव्हॉवर होती. नेहमीप्रमरने ओझा सकाळच्या सुमारास
ज्वेलरी शॉपमध्ये ड्यूटीसाठी गेला होता. त्यांनतर संध्याकाळी जवळपास ४ वाजताच्या सुमारास तो घरी परतला. घरी पोहोचल्यानंतर तो आपल्या पत्नी आणि मुलांसोबत काहीच न बोलता थेट खोलीत गेला. त्याने खिळीचा दरवाजा आतून बंद केला. काही वेळानंतर, खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला. घरातील लोक घाबरले.
कुटुंबीयांनी आरडाओरडा करून शेजारच्या लोकांना बोलावलं. आजूबाजूला राहणारे लोक तात्काळ प्रभाकरच्या घरी पोहोचले. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. बऱ्याच प्रयत्नांनंतर, खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा आताचे दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. आतमध्ये प्रभाकरचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव होत असल्याने तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्याची माहिती आहे.
पोलीस तपास सुरु
आत्महत्या केलेल्या प्रभाकरने रिव्हॉल्वर उत्तर प्रदेशच्या मेरठ येथून मिळवली होती. पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरु केला आहे. प्रभाकरने हत्या का केली यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा देखील पोलीस तपास करत आहे. पोलीस त्याच्या ओळखीच्या लोकांची आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे.
Amravati News: अमरावती एमआयडीसीत थिनर फॅक्टरीत भीषण स्फोट; महिला कामगाराचा होरपळून मृत्यू
Ans: प्रभाकर ओझा (वय 45), ज्वेलरी शॉपमध्ये सिक्योरिटी गार्ड म्हणून काम करणारे.
Ans: कांदिवलीतील पोईसर परिसरातील त्यांच्या घरात, बंद खोलीत लायसन्सी रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्यात आली.
Ans: आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून कुटुंबीय व ओळखीच्या व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे.