धक्कादायक ! कूलरचा करंट लागून 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
दक्षिण मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण मुंबईतील कालबादेवी परिसरात 7 फूट उंच भिंत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर या घटनेत आणखी एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. तसेच घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्च सुरु केलं.
हेदेखील वाचा- मुंबईकरांनो लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 दिवसांचा मेगाब्लॉक; आत्ताच प्रवासाचं नियोजन करा
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील कालबादेवी परिसरात एका घरावर कंपाऊंडची भिंत कोसळली. शहरातील चर्नी रोड भागातील चिरा बाजार येथील गांधी बिल्डिंगमध्ये ही घटना घडल्याच सांगितलं जातं आहे. भिंत कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ बचावकार्य सुरु केलं मुंबई अग्निशमन दलाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक बचाव उपकरणांचा वापर करत बचावकार्य सुरु केलं. खबरदारीचा उपाय म्हणून, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दोरीच्या साह्याने परिसराला वेढा घातला.
हेदेखील वाचा- TISS विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; अपार्टमेंटमध्ये सापडला मृतदेह, पोलीस तपास सुरु
या घटनेबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहितीनुसार, मुंबईतील कालबादेवी येथे घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. शहरातील चर्नी रोड भागातील चिरा बाजार येथील गांधी बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. कंपाऊंडची सुमारे 5 ते 7 फूट उंच आणि 30 फूट लांबीची भिंत शेजारच्या घरावर पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुंबई अग्निशमन दलाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक बचाव उपकरणांचा वापर करून तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. खबरदारीचा उपाय म्हणून, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दोरीच्या साह्याने परिसराला वेढा घातला.
क वॉर्डच्या कनिष्ठ अभियंत्याच्या म्हणण्यानुसार, भिंत पडल्याने जवळपास काम करणारे कामगार जखमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमएफबी, पोलीस, 108 रुग्णवाहिका आणि वॉर्ड कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. नय कुमार निषाद (वय ३०) आणि रामचंद्र सहानी (वय ३०) अशी मृतांची नावे आहेत. तर, सनी कनोजिया (वय १९) असं जखमीचं नाव आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ढिगाऱ्याखाली लोकांना वाचवण्यासाठी तात्काळ बचावकार्य सुरु केलं. त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढलं, मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.