Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण होणे गरजेचे, आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

१५ ते १८ वर्षे वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray On Vaccination) यांनी केले.

  • By साधना
Updated On: Jan 03, 2022 | 07:40 PM
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: कोरोना (Corona) व ओमायक्रॉनची वाढती रूग्णसंख्या (Omicron Patients) लक्षात घेता १५ ते १८ वर्षे वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray On Vaccination) यांनी केले. कोविड १९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अंतर्गत १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची मोहीम आज मुंबईत सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी एकूण नऊ लसीकरण केंद्र निर्देशित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर, महानगरपालिकेच्या शाळांमधील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसह इतरही मुलांना विनामूल्य लस देण्यात येणार आहे.आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकूल कोविड लसीकरण केंद्रात दुरदृश्य प्रणालीद्वारे उदघाटन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

[read_also content=”मुंबई वगळता राज्यातील शाळा सुरुच राहणार, गरजेनुसार स्थानिक पातळीवर होणार निर्णय, मार्गदर्शक सूचनांच्या काटेकोर पालनाचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/education-minister-varsha-gaikwad-on-schools-closing-nrsr-217827.html”]

याप्रसंगी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अ‍ॅड. सुहास वाडकर,आ. झिशान सिद्दिकी, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, प्रभाग समिती अध्यक्षा प्रज्ञा भुतकर, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, अतिरिक्त पालिका आयुकत सुरेश काकाणी, उपआयुक्त पराग मसुरकर, संजय कुर्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे, बीकेसी जम्बो कोविड समर्पित रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेश डेरे हे मान्यवर उपस्थित होते.

ठाकरे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा टप्पा आजपासून सुरु होत आहे,ही आनंदाची बाब आहे. कोविड काळात केलेल्या कामाबद्दल धारावी मॉडेल व महानगरपालिकेचे कौतुक संपूर्ण जगभरात झाले आहे. शासन, प्रशासन म्हणून आपण नेहमी काम करीत असतो. कोविड रुग्णांची आजची वाढती संख्या लक्षात घेतली तर ती साडेआठ हजाराच्या घरात गेली आहे. वाढत्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वेळेत होणे महत्त्वाचे आहे.प्रत्येक व्यक्ती तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी आपला सेकंड डोससुद्धा निर्धारित वेळेत घ्यावा,असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

कोविडच्या केसेस वाढत असताना प्रत्येकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.१५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेने लसीकरणाची संपूर्ण तयारी केली असल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले.अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, महानगरपालिकेने १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील नऊ लसीकरण केंद्रांवर योग्य ती व्यवस्था केली आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या संमती पत्रानंतरच आपण लसीकरण करीत आहोत. लसीकरणानंतर विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास उद्भवल्यास नजीकच्या केंद्रात संपर्क साधावा,असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Aaditya thackeray opinion about vaccination to students nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2022 | 07:39 PM

Topics:  

  • AadityaThackeray

संबंधित बातम्या

“म्हणून हे फडतूस कॅरेक्टर बोलू लागतात…; भाजप खासदार निशिकांत दुबेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात
1

“म्हणून हे फडतूस कॅरेक्टर बोलू लागतात…; भाजप खासदार निशिकांत दुबेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात

“आदित्य ठाकरेला ड्रग्जची घेण्याची सवय…”; संजय निरुपम यांच्या दाव्याने एकच खळबळ, थेट ड्रग्जचे सांगितले नाव
2

“आदित्य ठाकरेला ड्रग्जची घेण्याची सवय…”; संजय निरुपम यांच्या दाव्याने एकच खळबळ, थेट ड्रग्जचे सांगितले नाव

Aditya Thackeray News: ‘मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सरकारमधील काही मंत्रीच…’;आदित्य ठाकरेंचे खळबळजनक विधान
3

Aditya Thackeray News: ‘मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सरकारमधील काही मंत्रीच…’;आदित्य ठाकरेंचे खळबळजनक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.