Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ABVP :टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस: विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत अभाविप आक्रमक

ABVP : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधील विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेनंतर अभाविप आक्रमक झाली आहे. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याला वेळेत वैद्यकीय उपचार उपलब्ध झाले नसल्याचा आरोप करत अभाविपने प्रशासनाच्या वैद्यकीय सुविधांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 09, 2026 | 08:47 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • घटना काय ?
  • अभाविपच्या प्रमुख मागण्या
  • अभाविप मुंबईचे मुंबई महानगर मंत्र्यांचे मत
ABVP : नीता परब : मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) कॅम्पसमधील विद्यार्थ्याला वेळेत प्राथमिक वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली हाेती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांबाबत अभाविप मुंबई व संबंधित विद्यार्थ्यांच्या वतीने मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आवारात बुधवारी निदर्शन करण्यात आली व यावेळी प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले.

घटना काय ?

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधील विद्यार्थी डॉ. जनार्दनन पी. कॅम्पस मध्ये वेळेत प्रा‌थमिक वैद्यकीय उपचार मिळाले नाही परिणामी, त्याची प्रकृती खालावली व विद्यार्थ्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली हाेती. या पार्श्वभूमीवर कॅम्पसमधील आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना वेळेवर रुग्णवाहिका व आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अभाविपने केली आहे.

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

अभाविपच्या प्रमुख मागण्या

– कॅम्पसमध्ये २४×७ आपत्कालीन वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिका, तसेच बॅकअप रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी.
– आपत्कालीन परिस्थितीसाठी स्पष्ट एसओपी व हेल्पलाइन व्यवस्था लागू करावी.
– बीएआरसी हॉस्पिटल किंवा जवळच्या सुपर-स्पेशालिटी रुग्णालयाशी एमओयू करून विद्यार्थ्यांना तातडीच्या उपचारांची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
– प्रत्येक विद्यार्थ्याला आरोग्य व अपघात विमा संरक्षण द्यावे.
– टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हेल्थ सेंटरमध्ये पुरेसे डॉक्टर, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, आवश्यक औषधे आणि आपत्कालीन उपकरणे उपलब्ध करून द्यावीत.

आरोग्य व्यवस्था डिजिटल करण्यावर प्रशासनाचा भर! उपतक्रारी, जन्म-मृत्यू नोंदी आणि खरेदी प्रक्रियेवर असणार डॅशबोर्डची नजर

अभाविप मुंबईचे मुंबई महानगर मंत्र्यांचे मत

अभाविप मुंबईचे मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले, “डॉ. जनार्दनन पी. यांच्या मृत्यूने संपूर्ण विद्यार्थी समुदायाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस प्रशासनाने कॅम्पसमधील आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेचा गांभीर्याने आढावा घेणे अत्यंत आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, वैद्यकीय मदत आणि योग्य रुग्णालयात तातडीने उपचार मिळणे ही मूलभूत आवश्यकता आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता या मागण्यांवर ठोस आणि कालबद्ध कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेच्या प्रश्नावर अभाविप मुंबई कोणतीही तडजोड करणार नाही. संबधित मागण्यांवर येत्या १० दिवसांच्या आत ठोस, दृश्यमान आणि समाधानकारक कार्यवाही करण्याची मागणी अभाविप मुंबईने केली आहे.

Web Title: Abvp tata institute of social sciences abvp aggressive regarding students death timely medical treatment not available on campus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • ABVP
  • Student Death
  • Tata

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.