
मुंबईच्या नद्यांना मिळणार 'गावपण'! (photo Credit - X)
मुंबईतील मिठी नदीसह दहिसर, ओशिवरा, पोईसर या नद्यांना आता पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पावले उचलली आहेत. मुंबई उपनगरात पूर्वी गावच्या नदीप्रमाणे मिठीसह दहिसर, ओशिवरा, पोईसर या नद्यांमधील पाणी स्वच्छ होते.
सांडपाण्यावर प्रक्रिया करून थेट समुद्रात सोडण्यात येणार
नॅशनल पार्कमधून उगम पावणाऱ्या या नद्यांच्या पाण्याचा वापर शेतीसह अन्य कारणासाठी केला जात होता, नदीच्या दोन्ही बाजूस सेवारस्ता बांधून आजूबाजूच्या वसाहतीतून येणारे सांडपाणी मलजलवाहिनी टाकून उदंचन केंद्रापर्यंत वाहून नेणे व पुढे समुद्रात सोडण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. ओशिवरा नदीचा उगम गोरेगाव, आरे कॉलनीमध्ये होतो. सुमारेस ७ किमी लांबीची ही नदी नॅशनल पार्कमधून पुढे गोरेगावच्या टेकड्यांमधून वाहते. त्यानंतर ती ओशिवरा औद्योगिक वस्तीतून जाते आणि मालाडजवळच्या खाडीमार्गे अरबी समुद्राला मिळते. त्याचबरोबर दहिसर नदी पश्चिम उपनगरातील बोरीवली नॅशनल पार्कमधील तुळशी तलावातून उगम पावते. ८ किमी लांबीची ही नदी पुढे बोरिवली भागातून वाहत जात, गोराई-मनोरी खाडीला मिळते. त्याचसोबत पोईसर नदीचा उगम बोरीवली नॅशनल पार्क येथून होतो.
सांडपाण्यावर करणार प्रक्रिया
झोपडपट्ट्यांतून नदीत येणाऱ्या सांडपाण्याला अटकाव घालून तेथे मलःजलप्रक्रिया केंद्र बांधून प्रक्रीया केलेले पाणी नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीमध्ये पावसाळ्याव्यतिरिक्त स्वच्छ पाण्याचा प्रवाह राहील, असा विश्वास पर्जन्य जलवाहिनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा: राज्यात सुमारे दीड लाख मुले कुपोषित; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती