Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mhada: सोडतीत घर जिंकलं, पण प्रत्यक्ष ताब्यासाठी संघर्ष; मात्र लोकशाही दिनातून अर्जदाराला…

Mhada: लोकाभिमुख प्रशासन आणि कालमर्यादेत तक्रार निवारण यांना म्हाडा प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे. नागरिकांना केवळ आश्वासने न देता त्यांच्या प्रश्नांचे प्रत्यक्ष निराकरण करून दिलासा देणे, हाच लोकशाही दिनाचा खरा उद्देश आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 24, 2026 | 11:18 AM
सोडतीतील सदनिकेचा तातडीने मिळाला ताबा

सोडतीतील सदनिकेचा तातडीने मिळाला ताबा

Follow Us
Follow Us:
  • म्हाडाच्या लोकशाही दिनातून अर्जदाराला न्याय
  • सोडतीतील सदनिकेचा तातडीने मिळाला ताबा
  • अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या निर्देशांमुळे घराचा प्रश्न मार्गी
मुंबई/Mhada: म्हाडाच्या सोडतीत हक्काचे घर मिळणे हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचे स्वप्न असते. मात्र, या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेत सदनिका लागल्यानंतरही विकासकाच्या अवाजवी मागण्यांमुळे, तिचा ताबा मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागल्यास संबंधित अर्जदारासाठी ही मोठी व्यथा ठरते. अशा वेळी नागरिकांची व्यथा समजून घेत त्यांच्या प्रश्नांचे कालमर्यादेत निराकरण करणे, ही प्रशासनाची जबाबदारी असल्याने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (Homes) प्राधिकरणाच्या (म्हाडा) लोकशाही दिनातून हीच संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासनाची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये आयोजित २० टक्के सर्वसमावेशक योजनेच्या सोडतीत श्री. ज्ञानेश्वर गरकळ विजेते ठरले होते. त्यांनी सदनिकेची संपूर्ण विक्री किंमत अदा केली होती. मात्र, संबंधित विकासकाकडून पायाभूत सुविधा विकास शुल्काच्या नावाखाली वाढीव रकमेची मागणी करण्यात येत असल्याने सदनिकेचा ताबा मिळण्यात अडचण निर्माण झाली होती. परिणामी, आपल्या हक्काच्या घरासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने श्री. गरकळ यांनी १२ ऑक्टोबर, २०२६ रोजी आयोजित २२ व्या लोकशाही दिनात तक्रार दाखल केली.

Mhada चा मोठा निर्णय! GTB नगरच्या रहिवाशांना मिळणार महिन्याला २० हजार, तर…

या तक्रारीची गंभीर दखल घेत म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांनी सुनावणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना वाढीव शुल्क आकारणीसंदर्भात आवश्यक निर्देश देण्यास सांगितले. तसेच, अर्जदाराला सदनिकेचा ताबा मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधित यंत्रणेने तत्परतेने कार्यवाही केली आणि श्री. गरकळ यांना त्यांच्या सदनिकेचा ताबा मिळाला.

लोकशाही दिन हा केवळ तक्रार मांडण्याचा मंच नसून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी परिणामकारक ठरणारा उपक्रम असल्याचे या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे. लोकाभिमुख प्रशासन आणि कालमर्यादेत तक्रार निवारण यांना म्हाडा प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे. नागरिकांना केवळ आश्वासने न देता त्यांच्या प्रश्नांचे प्रत्यक्ष निराकरण करून दिलासा देणे, हाच लोकशाही दिनाचा खरा उद्देश आहे. गरकळ यांना मिळालेला सदनिकेचा ताबा हे या उपक्रमाच्या परिणामकारकतेचे उदाहरण ठरले आहे. लोकशाही दिनामुळे नागरिकांना आपली बाजू थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळते, तर संबंधित यंत्रणेला प्रलंबित प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन न्याय्य तोडगा काढता येतो.

जानेवारी-२०२४ पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयातील सभागृहात म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करून घ्यावे. आजतागायत म्हाडामध्ये २२ लोकशाही दिन कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

लोकशाही दिनांतर्गत नागरिकांच्या प्राप्त तक्रारी अर्जांवर संबंधित अधिकार्‍यांच्या उपस्थितीत थेट व खुली चर्चा केली जाते. यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली असून नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि त्वरित न्याय मिळत आहे. या उपक्रमामुळे म्हाडा प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी व नागरिकांप्रती संवेदनशील बनले असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. प्रत्येक लोकशाही दिन कार्यक्रमापूर्वी जयस्वाल यांच्याकडून यापूर्वी झालेल्या लोकशाही दिनातील प्रकरणांवर अधिकार्‍यांकडून होत असलेल्या कार्यवाहीचा देखील आढावा घेण्यात येतो. यामुळेच तसेच लोकशाही दिन हा नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचा मजबूत दुवा ठरत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: म्हाडा लोकशाही दिन कधीपासून आयोजित केला जातो?

    Ans: जानेवारी-२०२४ पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयातील सभागृहात म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे.

  • Que: लोकशाही दिन कशासाठी आयोजित केला जातो?

    Ans: लोकशाही दिन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी परिणामकारक ठरणारा उपक्रम असल्याचे या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे.

Web Title: Applicant receives immediate possession of flat through mhada lokshahi din tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • mhada
  • MHADA Homes
  • MHADA Lottery 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.