
BMC Election 2026: मतदानादरम्यान वांद्रेमध्ये ईव्हीएम मशीन बंद! केंद्राबाहेर गर्दी, मतदारांचा गोंधळ
महाराष्ट्रात आज सर्वत्र मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा आहेत. मात्र अशातच अद्याप मुंबईतील वांद्रेमध्ये माउंट मेरी पोलिंग बूथवर मतदानाची सुरुवात झालीच नाही. कारण मशीन बंद आहे. अद्याप मशीन सुरु न झाल्याने मतदारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मतदान करण्यासाठी मोठ्या मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता. मात्र मशीन बंद पडल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ईव्हीएम मशीन कधी सुरु होणार आणि मतदानाची प्रक्रिया कधी सुरु होणार आहे, याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे मतदार घरी जात आहेत.
वांद्रे येथील माउंट मेरी या मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदार रांगेत थांबले होते. कारण दरवर्षी मतदान करण्याचा वेळ सकाळी 7 वाजल्यापासून सुरु होतो. मात्र यावेळी मतदान सकाळी 7:30 वाजता सुरु करण्यात आले. त्यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र मतदान सुरु होण्यापूर्वी ईव्हीएम मशीन बंद पडले होते. बराच वेळ मशीन सुरु न झाल्याने मतदार निराश झाले होते. कारण अनेक लोकं सकाळी मतदान करून कामासाठी जातात. मात्र ईव्हीएम मशीन बंद असल्यामुळे मतदार पुन्हा घरी जात होते. (फोटो सौजन्य – X)
आज गुरुवारी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूकीच्या मतदानाला आज सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. 227 जागांसाठी 1700 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बुधवारी, बीएमसीने जाहीर केले की गुरुवारी शांततापूर्ण आणि सुरळीत मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या महत्त्वपूर्ण निवडणुकीत 227 जागांसाठी 1,700 उमेदवार निवडणूक लढवतील. सर्व मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे. उद्या शुक्रवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे आज आणि उद्या या दोन्ही दिवसांनिमित्त मतदारांमध्ये आणि उमेदवारांमध्ये उत्साह आहे.
मंबईतील दहिसर परिसरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये निवडणूकीपूर्वी मिक्सरचे वाटप केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मिक्सर वाटप करणारे लोकं भाजप कार्यकर्ते असल्याचा आरोप केला जात आहे. हा व्हिडीओ मुंबईच्या दहिसर परिसरातील शांतिनगर वार्ड नंबर 3 मधील असल्याचे सांगितलं जात आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर, काँग्रेस नेत्यांनी आक्षेप व्यक्त केला आणि व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली.