• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Maharashtra Municipal Election Voting 2026 Live Updates Marathi

Municipal Election Voting 2026 Live: राज्यातील २९ महापालिकांसाठी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात

सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास सुरुवात होईल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष  आज महाराष्ट्राकडे लागले आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 15, 2026 | 08:40 AM
LIVE
Municipal Election Voting 2026 in Marathi
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • 15 Jan 2026 08:40 AM (IST)

    15 Jan 2026 08:40 AM (IST)

    शेवटच्या क्षणी निवडणूक आयोगाने पाडू मशीन आणलं

    निवडणूक आयोगाने पाडू मशीन आणलं आहे. हे मशीन सगळीकडे ठेवलं जाणार आहे. याबाबत कोणतीही माहिती निवडणूक आयोगाने दिली नव्हती. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी हा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

  • 15 Jan 2026 08:30 AM (IST)

    15 Jan 2026 08:30 AM (IST)

    रात्रभर संभाजीनगरात पैशांचा पाऊस - दानवे

    भाजपाने निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडला आहे. महाराष्ट्रातील जनता भाजपाला नक्कीच त्यांची जागा दाखवेल. भाजपाने रात्रभर संभाजीनगरात पैशांचा पाऊस पाडला आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

  • 15 Jan 2026 08:23 AM (IST)

    15 Jan 2026 08:23 AM (IST)

    मतदान केंद्राबाहेर रांगा

    मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. आजच्या निवडणुकीसाठी मतदारांचा मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे.

  • 15 Jan 2026 08:18 AM (IST)

    15 Jan 2026 08:18 AM (IST)

    मतदानापूर्वी विनोद घोसाळकरांनी केली देवपूजा

    ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी घरामध्ये देवपूजा केली आणि आता ते मतदान करण्यासाठी रवाना होणार आहेत.

  • 15 Jan 2026 08:15 AM (IST)

    15 Jan 2026 08:15 AM (IST)

    मतदान हा लोकशाहीचा सण- सुमित राघवन

    महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अभिनेता सुमित राघवन आणि त्यांची पत्नी चिन्मयी राघवन मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. यावेळी सुमित राघवन म्हणाले की, मतदान हा लोकशाहीचा सण आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.

  • 15 Jan 2026 08:12 AM (IST)

    15 Jan 2026 08:12 AM (IST)

    मुंबई पोलिसांनी बजावला मतदानाचा हक्क

    महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे. निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी सज्ज असतानाच पोलिसांनी मतदानाचा हक्क देखील बजावला आहे.

     

     

  • 15 Jan 2026 08:06 AM (IST)

    15 Jan 2026 08:06 AM (IST)

    मुंबईत मतदान केंद्रांवर माध्यम प्रतिनिधींना बंदी

    अधिकृत प्रवेशिका असतानाही मतदान केंद्रात माध्यम प्रतिनिधींना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. केवळ रांगेचं चित्रीकरण करण्यास परवानगी असल्याची निवडणूक आयोगाची भूमिका आहे. मुंबई वगळता इतरत्र मात्र माध्यम प्रतिनिधींची कुठेही अडवणूक केली जात नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

  • 15 Jan 2026 07:50 AM (IST)

    15 Jan 2026 07:50 AM (IST)

    मुंबईतील ‘या’ दोन उमेदवारांची उमेदवारी करण्याची RSSची निवडणूक आयोगाकडे मागणी

    Municipal Election Voting 2026 Live:  मुंबईतील दोन उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. वॉर्ड क्रमांक ११८ आणि १२२ मधील उमेदवारांविरोधात संघाने तक्रार दाखल केली आहे.

    देश जनहित पार्टीकडून उमेदवारी देण्यात आलेल्या वैशाली जी आणि प्रशांत जी या दोन्ही उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या दोघांचा उल्लेख प्रचारामध्ये संघाचे पुरस्कृत उमेदवार असा करण्यात आल्यामुळे मतदारांची दिशाभूल होत असल्याचा आरोप RSSकडून करण्यात आला आहे.

  • 15 Jan 2026 07:45 AM (IST)

    15 Jan 2026 07:45 AM (IST)

    Mumbai Municipal Election Voting: मतदानाच्या दिवशी मुंबईत ‘लाडकी बुलेट’ योजना

    मतदान जनजागृतीसाठी मुंबईत ‘लाडकी बुलेट’ योजना सुरू करण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मुंबईतील बुलेट वर्ल्ड या व्यावसायिकांनी ही अनोखी कल्पना राबवली आहे. मतदान केल्याचा पुरावा दाखवल्यास बुलेट बाईकचे मोफत सर्व्हिसिंग दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत बाईकची मोफत तपासणी, इंजिन ऑइल बदल आणि मोफत वॉश यांसारख्या सेवा देण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे तरुण मतदारांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.

  • 15 Jan 2026 07:40 AM (IST)

    15 Jan 2026 07:40 AM (IST)

    Mumbai Municipal Election Voting 2026 : मुंबईत राज्य निवडणूक आयोगाचा मनमानी कारभार

    मुंबईत महापालिका निवडणुकीदरम्यान राज्य निवडणूक आयोगाचा अजब कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. अधिकृत प्रवेशिका असतानाही माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश नाकारण्यात येत आहे. केवळ मतदानासाठी लागलेल्या रांगेचे चित्रीकरण करण्यासच परवानगी दिली जात असल्याची भूमिका निवडणूक आयोगाकडून मांडण्यात आली आहे. या निर्णयामुळे माध्यमांच्या कामकाजावर मर्यादा येत असून राज्य निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मुंबई वगळता राज्यातील इतर भागांत मात्र माध्यम प्रतिनिधींना कुठेही अडवणूक करण्यात आलेली नाही, अशी माहिती समोर येत आहे.

  • 15 Jan 2026 07:30 AM (IST)

    15 Jan 2026 07:30 AM (IST)

    Jalgaon Municipal Election Voting: जळगाव महापालिका निवडणूक

    जळगाव महापालिका निवडणूक

    मतदानाची माहिती :

    1. एकूण मतदान केंद्रे — ५१६

    2. मतदानाची वेळ — सकाळी ७.३० वाजल्यापासून

    3. मतदान केंद्रांवर नियुक्त कर्मचारी — ३,०५५

    4. मतदान केंद्रांवर नियुक्त पोलीस कर्मचारी — ५१६

    मतदार संख्या :
    5) एकूण मतदार — ४ लाख ३८ हजार ५२३

    • पुरुष — २ लाख २५ हजार ३०८

    • महिला — २ लाख १३ हजार १७७

    • इतर — ३८

    ईव्हीएम यंत्रणा :
    6) बॅलेट युनिट — १,६००
    कंट्रोल युनिट — ८००

  • 15 Jan 2026 07:26 AM (IST)

    15 Jan 2026 07:26 AM (IST)

    राज्यातील 3.48 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

    राज्यातील महापालिकांच्या या महाकुंभात एकूण ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. मुंबई, नागपूर, ठाणे व पुण्यातील लढतींवर तर भाजप-शिवसेना विरोधात ब्रँड ठाकरे असा जंगी सामना रंगणार आहे.

  • 15 Jan 2026 07:25 AM (IST)

    15 Jan 2026 07:25 AM (IST)

    Municipal Election Voting 2026 Live : राज्यातील या २९ महापालिकांसाठी आज मतदान होत

    राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांमध्ये आज मतदान पार पडत आहे. विभागनिहाय महापालिकांची यादी पुढीलप्रमाणे —

    मुंबई महानगर प्रदेश (९)

    1. मुंबई
    2. नवी मुंबई
    3. ठाणे
    4. कल्याण-डोंबिवली
    5. वसई-विरार
    6. भिवंडी
    7. पनवेल
    8. मिरा-भाईंदर
    9. उल्हासनगर

    पश्चिम महाराष्ट्र (६)

    1. पुणे
    2. पिंपरी-चिंचवड
    3. कोल्हापूर
    4. सांगली
    5. सोलापूर
    6. इचलकरंजी

    उत्तर महाराष्ट्र (५)

    1. नाशिक
    2. अहिल्यानगर
    3. धुळे
    4. जळगाव
    5. मालेगाव

    मराठवाडा (५)

    1. छत्रपती संभाजीनगर
    2. लातूर
    3. नांदेड-वाघाळा
    4. परभणी
    5. जालना

    विदर्भ (४)

    1. नागपूर
    2. अकोला
    3. अमरावती
    4. चंद्रपूर

  • 15 Jan 2026 07:15 AM (IST)

    15 Jan 2026 07:15 AM (IST)

    Kolhapur Municipal Election Voting: कोल्हापूर  ८१ जागांसाठी  मतदान;३२७ उमेदवार रिंगणात

    Municipal Election Voting 2026 in Marathi: कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकूण ५९५ मतदान केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महापालिकेतील २० प्रभागांतील ८१ जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्यासाठी ३२७ उमेदवार रिंगणात आहेत.शहरातील एकूण ४ लाख ५४ हजार मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शहरात २१ उपद्रवी मतदान केंद्रे घोषित करण्यात आली असून, त्या ठिकाणी पोलिसांचा अधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुती विरुद्ध काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट अशी प्रमुख लढत होत आहे. तसेच राजर्षी शाहू विकास आघाडी आणि जनसुराज्य पक्षाचे उमेदवारही निवडणूक रिंगणात असल्याने काही ठिकाणी तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढत होत आहे.

  • 15 Jan 2026 07:10 AM (IST)

    15 Jan 2026 07:10 AM (IST)

    Nagpur Municipal Election Voting: नागपुरात महापालिका निवडणुकीच्या दिवशीच भाजप उमेदवारावर हल्ला

    Municipal Election Voting 2026 in Marathi  नागपुरात महापालिका निवडणूक दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूरच्या मेयो सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

      प्रभाग ११ मधील काँग्रेस उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या घटनेत भूषण शिंगणे यांच्या चेहऱ्यावर आणि नाकावर जोरदार मार लागला असून त्यांचा एक हात फ्रॅक्चर झाला.  घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

  • 15 Jan 2026 07:00 AM (IST)

    15 Jan 2026 07:00 AM (IST)

    Municipal Election Voting 2026 Live: मतदानासाठी ओळखपत्र नसल्यास १२ पैकी १ पुरावा आवश्यक

    मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) नसल्यास, त्याऐवजी खालील १२ पैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा दाखवून मतदारांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती शहर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

    मतदानासाठी ग्राह्य धरली जाणारी ओळखपत्रे पुढीलप्रमाणे —

    1. पासपोर्ट

    2. वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)

    3. पॅन कार्ड

    4. आधार कार्ड

    5. सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला छायाचित्रासह अपंगत्वाचा दाखला

    6. राष्ट्रीयीकृत बँका किंवा पोस्ट ऑफिस खातेदाराचे छायाचित्र असलेले पासबुक

    7. मनरेगा अंतर्गत देण्यात आलेले रोजगार ओळखपत्र

    8. निवृत्तिवेतनाशी संबंधित दस्तऐवज

    9. संसद, विधानसभा किंवा विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र

    10. केंद्र किंवा राज्य सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र

    11. स्वातंत्र्यसैनिकांचे छायाचित्र असलेले ओळखपत्र

    12. कामगार मंत्रालयाद्वारे वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

    वरीलपैकी कोणताही एक वैध ओळखपत्र सादर केल्यानंतर मतदारांना मतदान करता येईल.

  • 15 Jan 2026 06:50 AM (IST)

    15 Jan 2026 06:50 AM (IST)

    Pune Municipal Election Voting: पुणेकरांचा कौल आज मतपेटीत! तब्बल ९ वर्षांनंतर महापालिका निवडणूक

    Municipal Election Voting 2026 in Marathi : पुणे शहरातील ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. यंदा पुण्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार असून महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. भाजपला दोन्ही राष्ट्रवादींचे आव्हान असून, शिवसेना, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (उबाठा) आणि मनसेही निवडणूक रिंगणात आहेत.

    आकडेवारी

    • एकूण उमेदवार: १,१५३

    • एकूण मतदार: ३५ लाख ५२ हजार ६३७

      • पुरुष मतदार: १८ लाख ३२ हजार ७८९

      • महिला मतदार: १७ लाख १३ हजार ३६०

      • इतर मतदार: ४८८

    • एकूण मतदान केंद्रे: ४,०११

    • बिनविरोध निवडून येणारे उमेदवार: २

  • 15 Jan 2026 06:46 AM (IST)

    15 Jan 2026 06:46 AM (IST)

    Municipal Election Voting 2026 Live : मुंबईत २२७ जागांसाठी १,७०० उमेदवार मैदानात

    देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) २२७ जागांसाठी १,७०० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण उमेदवारांपैकी ८७९ महिला आणि ८२१ पुरुष आहेत. येथे लढाई चौकोनी आहे, ज्यामध्ये महायुती (भाजप + शिंदे सेना), महाविकास आघाडी (यूबीटी + राष्ट्रवादी, शरद पवार + काँग्रेस), मनसे आणि अपक्ष उमेदवार आमनेसामने आहेत.

  • 15 Jan 2026 06:41 AM (IST)

    15 Jan 2026 06:41 AM (IST)

    BMC Election Voter Turnout Over the Years: मागील वर्षांतील बीएमसी निवडणुकीत मतदारांची टक्केवारी

    •1992: 49.14%
    •1997: 44.36%
    •2002: 42.05%
    •2007: 46.05%
    •2012: 44.75%
    •2017: 55.28%

Municipal Election Voting 2026 in Marathi :महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास सुरुवात होईल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष  आज महाराष्ट्राकडे लागले आहे.

राज्यातील एकूण २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी ३ कोटी ४८ लाख ७९ हजार ३३७ मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी राज्यभरात ३९ हजार ९२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी राज्यात एकूण १५ हजार ९०८ उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे ४ सदस्यीय असून काही प्रभाग ३ किंवा ५ सदस्यीय आहेत. त्या त्या प्रभागातील सदस्यसंख्येनुसार मतदारांना तेवढीच मते द्यावी लागणार आहेत. त्यासाठी ईव्हीएमवर ४ वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका असतील. या निवडणुकीचा निकाल उद्या, म्हणजेच १६  जानेवारी  रोजी जाहीर होणार आहे.

 

 

Web Title: Maharashtra municipal election voting 2026 live updates marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 06:37 AM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

Municipal Elections : मतदान सुरु असतानाच निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; मतदान केंद्रांवर…
1

Municipal Elections : मतदान सुरु असतानाच निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; मतदान केंद्रांवर…

राज्यातील अनेक भागांत मतदानापूर्वीच पैशांचं वाटप; मतदारांना विविध आमिषं अन्…
2

राज्यातील अनेक भागांत मतदानापूर्वीच पैशांचं वाटप; मतदारांना विविध आमिषं अन्…

Municipal Elections : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात; प्रशासनाकडून चोख व्यवस्था
3

Municipal Elections : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात; प्रशासनाकडून चोख व्यवस्था

Maharashtra Politcs: प्रचार थांबला, पण राजकारण पेटलं! पुण्यनगरीत छुप्या प्रचाराचा ‘काळा खेळ’ उघड
4

Maharashtra Politcs: प्रचार थांबला, पण राजकारण पेटलं! पुण्यनगरीत छुप्या प्रचाराचा ‘काळा खेळ’ उघड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रात्रीच्या अंधारातही खुले असतात भारतातील ही रहस्यमयी मंदिरे, इथले दृश्य असते अद्भुत

रात्रीच्या अंधारातही खुले असतात भारतातील ही रहस्यमयी मंदिरे, इथले दृश्य असते अद्भुत

Jan 15, 2026 | 08:33 AM
Zodiac Sign: वाशी योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ

Zodiac Sign: वाशी योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ

Jan 15, 2026 | 08:31 AM
सतत दारू पिऊन सडलेलले लिव्हर पुन्हा एकदा होईल स्वच्छ! रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ जादुई पदार्थांचा समावेश

सतत दारू पिऊन सडलेलले लिव्हर पुन्हा एकदा होईल स्वच्छ! रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ जादुई पदार्थांचा समावेश

Jan 15, 2026 | 08:29 AM
Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Jan 15, 2026 | 08:05 AM
Top Marathi News Today Live: चांदीचे दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार? वाढत्या दराने ग्राहक चिंतेत

LIVE
Top Marathi News Today Live: चांदीचे दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार? वाढत्या दराने ग्राहक चिंतेत

Jan 15, 2026 | 08:02 AM
संध्याकाळची हलकी भूक भागवण्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेंगदाण्याचे चाट, पौष्टिक पदार्थांचा शरीराला होतील फायदा

संध्याकाळची हलकी भूक भागवण्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेंगदाण्याचे चाट, पौष्टिक पदार्थांचा शरीराला होतील फायदा

Jan 15, 2026 | 08:00 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या वाढत्या दराने ग्राहक हैराण, चांदी 3 लाखांच्या उंबऱ्यावर! जाणून घ्या आजच्या किंमती

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या वाढत्या दराने ग्राहक हैराण, चांदी 3 लाखांच्या उंबऱ्यावर! जाणून घ्या आजच्या किंमती

Jan 15, 2026 | 07:53 AM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : निवडणुकातील पारदर्शकतेवर नाना पटोलेंचे प्रश्नचिन्ह

NAGPUR : निवडणुकातील पारदर्शकतेवर नाना पटोलेंचे प्रश्नचिन्ह

Jan 14, 2026 | 07:16 PM
THANE : मकर संक्रांतीच्या निमित्ताने डॉ. लीना बोरुडे यांचा महिलांना आरोग्य सल्ला

THANE : मकर संक्रांतीच्या निमित्ताने डॉ. लीना बोरुडे यांचा महिलांना आरोग्य सल्ला

Jan 14, 2026 | 07:11 PM
NAGPUR : नागपूर महानगरपालिका निवडणूक, मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

NAGPUR : नागपूर महानगरपालिका निवडणूक, मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

Jan 14, 2026 | 07:05 PM
THANE : आयुर्वेदिक दृष्टिकोनातून मकर संक्रांतीचे महत्त्व काय आहे? डॉ. ऐश्वर्या रानडे

THANE : आयुर्वेदिक दृष्टिकोनातून मकर संक्रांतीचे महत्त्व काय आहे? डॉ. ऐश्वर्या रानडे

Jan 14, 2026 | 06:58 PM
सत्ता, पैसा आणि निवडणुका: महेश झगडे यांचं थेट, बेधडक भाष्य – EXCLUSIVE

सत्ता, पैसा आणि निवडणुका: महेश झगडे यांचं थेट, बेधडक भाष्य – EXCLUSIVE

Jan 14, 2026 | 06:54 PM
Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Jan 13, 2026 | 08:03 PM
महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP  राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

Jan 13, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.