
BMC Election 2026: अभिनेता अक्षय कुमारपासून माजी राज्यपाल राम नाईक... आतापर्यंत या दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
तसेच अभिनेता अक्षय कुमारने देखील मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्याने सर्व नागरिकांना विनंती केली की, घराबाहेर पडा आणि मतदान करा. अक्षय कुमार म्हणाला की, घरांना पाणीपुरवठा नाही, वीज नाही, खराब रस्ते आहेत, कचरा व्यवस्थापनाची कमतरता आहे, अशा तक्रारी आपण नेहमी करत असतो. या सर्व तक्रारींवरील उपाय म्हणजे योग्य उमेदवार निवडून देणे, ज्यामुळे आपल्या समस्या सोडवल्या जाऊ शकतील. आजा बीएमसी निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुंबईतील रहिवासी असल्याच्या नात्याने आज संपूर्ण कंट्रोल आपल्या हातात आहे. मी मुंबईतील सर्व नागरिकांना विनंती करत आहे की घराबाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजावा. जर आपल्याला मुंबईचे खरे हिरो व्हायचे असेल तर आपण संवादांमध्ये रमून जाऊ नये तर बाहेर येऊन मतदान केले पाहिजे.
मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी त्यांच्या पत्नीसह मतदान केंद्रावर जाऊन बीएमसी निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावरील मोठ्या रांगा पाहून त्यांनी अशी आशा व्यक्त केली की, यावेळी मोठ्या प्रमाणात लोकं घराबाहेर येऊन मतदान करतील. तसेच गायक विशाल दादलानी देखील मतदान करण्यासाठी केंद्रावर दाखल झाले आहेत. त्यांनी सांगितलं की, मी लोकांना आवाहन करणे थांबवले आहे. लोकांनी त्यांच्या देशासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मुंबईत अनेक समस्या आहेत आणि लोकांनी त्या लक्षात घेऊन पुढे जावे. याशिवाय, अभिनेता एजाज खान यांनी मतदान केल्यानंतर संवाद साधत सांगितलं की, रस्ते बांधतात, नंतर ते खोदतात आणि त्यात सर्व पैसे ओततात. यावेळी, अनेक वेळा मते दिली जात आहेत. त्यामुळे यंदा कामं प्रत्यक्षात पूर्ण होतील अशी आशा करूया.
BMC Election 2026: मतदानादरम्यान वांद्रेमध्ये ईव्हीएम मशीन बंद! केंद्राबाहेर गर्दी, मतदारांचा गोंधळ
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. गेल्या अनेक वर्षांपासून राम नाईक नेहमीच मतदानाच्या सुरुवातील वोटिंग करण्यासाठी मतदान केंद्रावर जातात. याबाबत राम नाईक यांनी सांगितलं की, 1960 मध्ये मी गोरेगावमध्ये राहत होतो. तेव्हापासून आतापर्यंत मी प्रत्येकवेळी मतदानाचा हक्क बजावत आहे. याचे कारण असे की मी कधी लोकसभा निवडणूक लढवत होतो तर कधी विधानसभा निवडणूक लढवत होतो, त्यामुळे मतदान केंद्रांना भेट देणे आणि तेथील मतदार आणि कार्यकर्त्यांना भेटणे माझ्यासाठी आवश्यक होते. हीच परंपरा आज देखील सुरु आहे.