BMC Election 2026: ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात गोंधळ! मतदार यादीतून मराठी माणसांची नावचं गायब, काय आहे नेमकं प्रकरणं?
BMC Election 2026: मतदानादरम्यान वांद्रेमध्ये ईव्हीएम मशीन बंद! केंद्राबाहेर गर्दी, मतदारांचा गोंधळ
सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी आहे. मतदानाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र तासाभरापासून मतदान करण्यासाठी रांगेत थांबलेल्या मतदारांचे नावच यादित नसल्याची घटना दादरमध्ये समोर आली आहे. मतदार यांदीमध्ये घोळ असल्याचा आरोप देखील मतदारांनी केला आहे. काही मतदारांचे नाव वार्ड क्रमांक १९२ मधून १९१ मध्ये गेले आहे. पण जेव्हा मतदार वार्ड क्रमांक १९१ मध्ये गेले. तेव्हा तिथे देखील या मतदारांचे नाव नसल्याची घटना समोर आली. त्यामुळे मतदान करण्यासाठी रांगेत थांबलेल्या मतदारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. (फोटो सौजन्य – X)
याशिवाय याच विभागातून आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. वार्ड क्रमांक १९२ च्या मतदार यादीमधून संपूर्ण कुटुंबाचे नावच वगळण्यात आल्याची घटना देखील घडली आहे. कुटूंबातील 5 जणांची नाव मतदार यादीत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मतदारांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांचा राग व्यक्त केला. यावेळी त्यांनी सांगितलं की, ते गेल्या तासाभरापासून यादीत नाव शोधण्यासाठी कोहिनूर आणि बाल मोहनला फिरत आहेत. मात्र अद्याप यादीमध्ये त्यांना त्यांचे नाव सापडले नाही. सुरूवातीपासून दिलेल्या वॉर्डमध्ये देखील यादी पाहिली पण त्यांना तिथे देखील त्यांचे नाव सापडले नाही. यामुळे दादरमधील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे.
‘आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देतो, फक्त असे भाषण दाखवा’; Uddhav Thackerayचे फडणवीसांना खुले आव्हान
यंदा महायुती आण महाविकास आघाडी यांच्या चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यंदा निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक पक्षांनी मतदानापूर्वी पैसे आणि वस्तू वाटल्याचा आरोप केला जात आहे. तर भाषणांमध्ये अनेक नेत्यांनी विरोधकांवर आरोप प्रत्यारोप करत त्यांच्या विकास कामांचा पाढा वाचून दाखवला. त्यामुळे या लढाईत विजय कोणाचा होणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.






