Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahayuti Politics: अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होणार? फडणवीस-राज ठाकरे भेटीनं चर्चांना उधाण

या बैठकीतील प्रत्यक्ष चर्चा काय झाल्या, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी भाजप आणि मनसेमधील संबंध सुधारत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 10, 2025 | 11:47 AM
Mahayuti Politics: अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होणार? फडणवीस-राज ठाकरे भेटीनं चर्चांना उधाण
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या  शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्येही जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. ही भेट फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच झाली असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस आणि राज ठाकरे यांनी जवळपास सव्वा तास चर्चा केली.

या बैठकीनंतर मनसे नेते अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यपाल नियुक्त आमदारपद ही राज्य सरकारच्या शिफारसीवर दिली जाणारी एक नामनिर्देशित जागा असते. जर अमित ठाकरे यांना हे पद मिळाले, तर मनसे आणि भाजप यांच्यातील राजकीय जवळीक आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Premanand Ji Mahararaj: कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने दिला धोका तर काय करावे,

अमित ठाकरे आमदार झाल्यास भाजप-मनसे युतीची शक्यता वाढेल का? हा देखील चर्चेचा विषय आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने भाजपविरोधात भूमिका घेतली होती, मात्र गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षांमध्ये सलोखा वाढल्याचे दिसत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीतील प्रत्यक्ष चर्चा काय झाल्या, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी भाजप आणि मनसेमधील संबंध सुधारत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. पुढील काही दिवसांत या राजकीय हालचालींचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या विचारधारा एकसारख्या असल्यातरी  निवडणुकीनुसार त्यांच्यातील जवळीकता आणि दुरावा सातत्याने बदलत असतो. लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. महायुतीतील काही उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या, ज्यामुळे मनसे-भाजपमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मनसेने स्वबळावर लढण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यावेळीही त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे संकेत दिले, मात्र मनसेच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही आणि दोन्ही पक्षांतील समीकरणे बदलली.

कॅनडाला पुन्हा मोठा धक्का; ‘त्या’ निर्णयाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

नुकत्याच झालेल्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. विशेषतः अजित पवार गटाच्या मोठ्या संख्येने आमदार निवडून आल्यावर त्यांनी संशय व्यक्त केला, तसेच भाजपवरही टीका केली. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे. मनसे-भाजप युतीबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता असून, अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार केल्यास मनसेला राजकीय संधी मिळू शकते. या भेटीनंतर दोन्ही पक्षांचे संबंध पुन्हा सुधारतील का, की हा केवळ एक तात्पुरता संवाद होता, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

 

Web Title: Devendra fadnavis raj thackeray meeting sparks discussions nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • Maharashtra Navnirman Sena

संबंधित बातम्या

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा
1

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

Dombovali : 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी
2

Dombovali : 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी

‘भाजपसोबत राज ठाकरे भेटत असतील तर…’; रोहित पवारांचं मोठं विधान
3

‘भाजपसोबत राज ठाकरे भेटत असतील तर…’; रोहित पवारांचं मोठं विधान

विद्येच्या माहेरघरात चाललंय तरी काय? आधी काढली मुलीची छेड, नंतर लिफ्टमध्ये अर्धा तास ठेवलं डांबून…..
4

विद्येच्या माहेरघरात चाललंय तरी काय? आधी काढली मुलीची छेड, नंतर लिफ्टमध्ये अर्धा तास ठेवलं डांबून…..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.