
Municipal Corporation Elections Maharashtra, Ticket Distribution Controversy, Political Nepotism India, AB Form Politics, BJP Ticket Distribution,
जळगावमधील प्रभाग क्रमांक १० मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कलाबाई शिरसाट यानी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज केला. मात्र, पक्षाकडून एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांना रडू कोसळले, दुसरीकडे, तिकीट मिळाल्यानंतर भाजपच्या एका उमेदवाराने गुडघे टेकून पक्ष नेतृत्वाचे आभार मानले.
भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, मेहुणी हर्षिता आणि बहीण डॉ. गौरवी नार्वेकर यांना तिकीट दिले आहे, मकरद आणि हर्षिता हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत, तर गौरवी पहिल्यांदाच बीएमसी निवडणूक लढवत आहेत. मुलुंड पश्चिमेतील प्रभाग क्रमांक १०७मधून माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. उबाठा सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या तेजस्विनी घोसाळकर थाना वॉर्ड क्रमांक २ मधून तिकीट देण्यात आले आहे. तेजस्विनी या माजी आमदार विनोद घोसाळकर याच्या सून आहेत.
Municipal Election 2026: राज्यातील १४ ठिकाणी भाजप-शिंदे गटाची युती फुटली; कोणत्या आहेत या महापालिका?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना तिकीट मिळाले आहे. मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक हे प्रभाग १६५ मधून निवडणूक लढवतील. त्यांची बहीण डॉ. सईदा खान याना प्रभाग १६९ मधून उमेदवारी देण्यात आली. कप्तान मलिक यांची सून बुसरा नदीम मलिक यांनाही प्रभाग १७० मधून तिकीट देण्यात आले आहे.
बीएमसीत काँग्रेसने आमदार अस्लम शेख यांच्या नातेवाईकांना पाच तिकिटे वाटली आहेत. प्रभाग ३४-हैदर अस्लम शेख (अस्लम शेख यांचा मुलगा), प्रभाग ३३ कुमार जहाँ मोहम्मद मोईन सिद्दीकी (अस्लम शेख यांची बहीण), प्रभाग ६२- सेक अहद खान (अस्लम शेख यांचा जावई), प्रभाग ४८ रफिक शेख (अस्लम शेख यांचा पुतण्या), प्रभाग १६५ मोहम्मद अशरफ आझमी (सासरे), प्रभाग १६७- समन अर्शद आझमी (सासरे) यांना उमेदवारी दिली. याशिवाय प्रभाग १४० मधून राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांची मुलगी प्रज्योती हंडोरे यांना संधी मिळाली आहे. माजी मंत्री नसीम खान यांचा मुलगा देखील त्यांच्या मुलासाठी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याचे नाव लवकरच जाहीर केले जाऊ शकते.