उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर होते. सकाळी सहा वाजल्यापासून त्यांनी विकासकामांची पाहणी करायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी काही अधिकाऱ्यांना झापलं आहे.
राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियममध्ये चेंजिंग रूमची सुविधा महिला खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मुस्लिम बहुल दामत गावात मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तल होत असल्याच्या तक्रारी सुरु होत्या.याप्रकरणी नेरळ पोलिसांनी धाड टाकली आणि गोवंश मांस तसेच कत्तल करणारे तीन जणांना ताब्यात…
नवीन नियमांनुसार चालकांना सरासरी दोन-स्टार रेटिंग राखणे आवश्यक आहे. जर एखाद्या चालकाचे रेटिंग या पातळीपेक्षा कमी झाले तर त्यांना प्रशिक्षणातून जावे लागेल आणि त्यांना अॅपमधून तात्पुरते काढून टाकले जाईल.
पनवेल मुंब्रा महामार्गावर नावडे ते रोडपाली सिग्नल दरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या मुळे अर्धा किलोमीटर असलेले हे आंतर कापण्यासाठी अनेकदा तासा भराचा कालावधी लागत आहे.
शिवाजीनगर, मॅाडेल कॉलनी परिसरातील महिलांसाठी कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने महाभोंडला तसेच भव्य लकी ड्रॅा कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस रविंद्र साळेगावकर यांनी केले होते.
वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक पत्र व्यवहाराची जागा डिजिटल माध्यमांनी घेतली असली, तरी टपाल खात्याचे महत्त्व आणि विश्वास आजही कायम आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी कल्याणकर खंबीरपणे उभे असून उद्योजक, सामाजिक संस्था, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडून 17 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय...
राज्य सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार, "सह-शिक्षण शैक्षणिक आणि अभ्यासेतर उपक्रमांमध्ये संतुलित सहभागाला प्रोत्साहन दिले जाणार आह. सह-शैक्षणिक शाळांचे कामकाज काळाच्या अनुषंगाने चालते.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) मंगळवारी महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द केला. सहकारी बँकेकडे पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाच्या संधी नसल्यानं RBI नं हे कठोर पाऊल उचललं. या बँकेत तुमचं तर खातं…
School Holidays, Diwali Holidays: येत्या काही दिवसांत सलग पाच दिवस शाळा बंद राहणार आहे. अनेक ठिकाणी १७ ऑक्टोबरपासून शाळांच्या सुट्ट्या सुरू होतील. त्याचप्रमाणे दिवाळीपासून छठपूजेपर्यंत सुट्ट्या असतील.
मंत्री बावनकुळे यांनी एका अधिकाऱ्याच्या डेस्क ड्रॉवरमध्ये लपवून ठेवलेली रोकड जप्त केली. भ्रष्टाचाराच्या तक्रारींना या घटनेमुळे पुष्टी मिळाल्याचे स्पष्ट झाले.
आरक्षणाचा लढा हा मनोज जरांगे यांनी खालच्या पातळीवर आणू नये, असे खडेबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी जरांगे यांना सुनावले आहेत.
ST Employees Protest News: महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने १२ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयावर 'मशाल मोर्चा' काढण्यात येणार आहे.
राज्यातील गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी रात्री उशिरा शिर्डी येथे राज्याच्या प्रमुख नेत्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली.