Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १७०० झोपडीधारकांनी घेतला लाभ

धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रकल्पाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळताना दिसत आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 19, 2026 | 09:11 PM
Dharavi redevelopment project special camp for dharavi residents, Dharavi redevelopment project,

Dharavi redevelopment project special camp for dharavi residents, Dharavi redevelopment project,

Follow Us
Close
Follow Us:
  • धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या वतीने विशेष शिबिर
  • शिबिरांमध्ये तब्बल १७०० झोपडीधारकांनी सहभाग
  • सदर शिबिरांमुळे नागरिकांच्या विविध प्रश्नांचे तत्काळ निरसन
धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रकल्पाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळताना दिसत आहे. नागरिकांच्या अनिर्णित प्रकरणे, कागदपत्र तपासणी, पात्रता प्रक्रिया आणि विविध शंकांचे निरसन करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या शिबिरांमुळे धारावी पुनर्विकास प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. १९ मे २०२६ पर्यंत सेक्टर १ (रेल्वे जमीन), सेक्टर २ आणि सेक्टर ३ मध्ये आयोजित शिबिरांमध्ये तब्बल १७०० झोपडीधारकांनी सहभाग नोंदवला.

यापैकी २१० नागरिकांची कागदपत्रे तपासून त्यांना पात्र, हस्तांतरण शुल्काच्या अधीन पात्र किंवा सशुल्क पात्र म्हणून मान्यता देण्यात आली. तसेच सुमारे ३०० अर्ज कागदपत्र पडताळणीसाठी स्वीकारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ११९० नागरिकांच्या शंकांचे निरसन झाल्यानंतर त्यांनी सर्वेक्षण प्रक्रियेस सहमती दर्शवली आहे. या शिबिरांमध्ये नागरिकांना आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन, प्रत्यक्ष सहाय्य आणि प्रक्रिया समजावून सांगण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होत असून पुनर्विकास प्रक्रियेबाबत विश्वास वाढताना दिसत आहे.

मुंबई महानगरपालिका पाणी कर वाढवणार? खर्चातील वाढीमुळे ६ ते ७ टक्के दरवाढीची शक्यता; अतिरिक्त आयुक्त स्तरावर चर्चा

सदर शिबिरांमुळे नागरिकांच्या विविध प्रश्नांचे तत्काळ निरसन होत असून पात्रता व सर्वेक्षण प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान करण्यात येत आहे. नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन, कागदपत्र पडताळणी तसेच विविध प्रक्रियांबाबत प्रत्यक्ष सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या पुढील शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व प्रकल्पाशी संबंधित आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात आणि आपले हक्काचे घर सुनिश्चित करावे, अशी विनंती धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे सचिव विपीन पालीवाल यांनी केली आहे.

मध्य रेल्वेच्या ‘ऑपरेशन जीवन रक्षक’ची कमाल; ४ महिन्यांत २५ प्रवाशांना मृत्यूच्या दारातून खेचलं बाहेर

Web Title: Dharavi redevelopment project special camp for dharavi residents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 09:11 PM

Topics:  

संबंधित बातम्या

Maharashtra First Conclave 2026 : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा वनवास कधी संपणार? CM फडणवीसांनी दिली डेडलाईन
1

Maharashtra First Conclave 2026 : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा वनवास कधी संपणार? CM फडणवीसांनी दिली डेडलाईन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.