Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM-VBRY: पंतप्रधान मोदींच्या हस्ते २४०० कोटींचे वितरण; कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढांची उपस्थिती

प्रधानमंत्री आदरणीय  नरेंद्र मोदी  यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेली PM-VBRY योजना ही देशातील रोजगारनिर्मितीला नवी दिशा देणारी ठरत आहे, असे लोढा म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 19, 2026 | 09:29 PM
PM-VBRY: पंतप्रधान मोदींच्या हस्ते २४०० कोटींचे वितरण; कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढांची उपस्थिती

PM-VBRY: पंतप्रधान मोदींच्या हस्ते २४०० कोटींचे वितरण; कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढांची उपस्थिती

Follow Us
Follow Us:

नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते 2,400 कोटींच्या रकमेचे वितरण
15 लाखांहून अधिक व्यक्तींसाठी अतिरिक्त रोजगाराला चालना
200 ठिकाणी समांतर कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई: प्रधानमंत्री आदरणीय  नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) अंतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे सुमारे ₹2,400 कोटींच्या प्रोत्साहन रकमेचे वितरण करण्यात आले. PM-VBRY अंतर्गत हे प्रोत्साहन वितरण 15 लाखांहून अधिक व्यक्तींसाठी अतिरिक्त रोजगाराला चालना देण्यास मदत करेल, अशी अपेक्षा आहे.

देशव्यापी जनजागृती आणि लाभवितरण मोहिमेचा भाग म्हणून देशभरातील 200 ठिकाणी समांतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), प्रादेशिक कार्यालय, मुंबई (दादर) यांच्या वतीने वरळी येथील एचएसएनसी विद्यापीठामध्ये प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना जनजागृती व लाभार्थी वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री  मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मुंबई होणार ‘ड्रग्ज मुक्त’! सरकार ॲक्शन मोडमध्ये; Mangal Prabhat Lodha यांच्याकडे असणार ‘ही’ जबाबदारी

यावेळी बोलताना लोढा म्हणाले, “प्रधानमंत्री आदरणीय  नरेंद्र मोदी  यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेली PM-VBRY योजना ही देशातील रोजगारनिर्मितीला नवी दिशा देणारी ठरत आहे. या योजनेमुळे युवकांना औपचारिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, नियोक्त्यांनाही रोजगारनिर्मितीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी अशा योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे.”

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी रोजगार-संलग्न प्रोत्साहन (Employment Linked Incentive – ELI) योजना असून, औपचारिक रोजगाराला प्रोत्साहन देणे, प्रथमच रोजगार क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या युवकांना आधार देणे आणि अतिरिक्त रोजगारनिर्मितीसाठी नियोक्त्यांना प्रोत्साहन देणे हा तिचा प्रमुख उद्देश आहे.

मुंबई आधी कोळी बांधवांचीच; गिरगाव चौपाटीवरील बोटी हटवण्याच्या कारवाईला मंत्री मंगल प्रभात लोढांचा ब्रेक, प्रशासनाला कडक निर्देश

₹99,446 कोटींच्या एकूण तरतुदीसह, PM-VBRY चा उद्देश दोन वर्षांच्या कालावधीत देशभरात 3.5 कोटींपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती सुलभ करणे हा आहे. यापैकी अंदाजे 1.92 कोटी लाभार्थी हे औपचारिक कार्यबलात प्रथमच प्रवेश करणारे असतील, अशी अपेक्षा आहे. मुंबई विभागामध्येही या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, EPFO मुंबई-1 (बांद्रा) विभागाने PM-VBRY च्या भाग-अ अंतर्गत 39,439 लाभार्थ्यांना ₹25.44 कोटींपेक्षा अधिक रक्कम वितरित केली आहे. तसेच भाग-ब अंतर्गत 1,815 लाभार्थ्यांना ₹110.61 कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन वितरित करण्यात आले आहे. रोजगारनिर्मिती, कार्यबलाचे औपचारिकीकरण आणि सामाजिक सुरक्षा कवचाचा विस्तार या दिशेने PM-VBRY हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असून, विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी ही योजना प्रभावी योगदान देत आहे.

Web Title: Distribution of 2400 crore by prime minister modi minister mangal prabhat lodha pm vbry news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 09:28 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • New employment
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
1

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
2

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

‘संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे…’; Mangal Prabhat Lodha यांचे तरुणांना आवाहन
3

‘संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे…’; Mangal Prabhat Lodha यांचे तरुणांना आवाहन

Rojgar Mahakumbh Maharashtra: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज! १,५८८ नियोक्ते सहभागी, ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी
4

Rojgar Mahakumbh Maharashtra: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज! १,५८८ नियोक्ते सहभागी, ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.