Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Phone tapping news: एकनाथ शिंदेंचे दिल्लीतून फोन टॅपिंग..?; खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ

सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे. शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे आणि फडणवीस यांची तोंडे दोन दिशांना होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 02, 2025 | 12:36 PM
Phone tapping news: एकनाथ शिंदेंचे दिल्लीतून फोन टॅपिंग..?; खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

मागील काही दिवसांपासून महायुतीत काही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून  एकनाथ शिंदे नाराज असल्याचेही बोलले जात आहे. अनेकदा त्यांची नाराजी उघडपणे समोरही आली. असे सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांचे फोन दिल्लीतून टॅप केले जात असल्याची बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीच हा खळबळजनक दावा केला आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत, असे शिंदेंना खात्रीने वाटते.  दिल्लीच्या एजन्सी त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदे यांना संशय आहे, पण शिंदे यांची पुरती कोंडी आता झाली आहे,” अशी माहिती शिंदेंच्याच आमदाराने दिल्याचा खळबळजनक दावा ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद आहे. त्यामुळे सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे. शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे आणि फडणवीस यांची तोंडे दोन दिशांना होती.

Pankaja Munde : राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे…; पंकजा मुंडेंचे

संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सरदार यासंदर्भात दावा केला आहे. “मुख्यमंत्री फडणवीस आता एकनाथ शिंदेंवर दबाव टाकत आहेत, कारण शिंदे यांच्याकडे सध्या काहीच उरलेले नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध आता जवळजवळ तुटले आहेत. परिणामी दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत.

याच दरम्यान, भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शिंदे यांच्या लोकांसोबत नियमित जनता दरबार घेण्याचा निर्णय जाहीर केला.  ज्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाने यावर आक्षेप घेतला आहे.  त्यामुळे राज्यातील सरकारची अवस्था किती कमजोर आणि अनियंत्रित आहे, हे स्पष्ट होते. प्रशासन आणि जनतेच्या समस्यांकडे कुणाचं लक्ष नाही, याकडेही संजय राऊतांनी लक्ष वेधलं.

DeepSeek चॅटबॉटची क्रेझ वाढली, 140 देशांमध्ये गाठलं अव्वल स्थान! भारतातील

शिंदे गटाचे काही आमदार विमान प्रवासात भेटले आणि त्यांनी माहिती दिली, ज्यामुळे गोंधळ उडाला. शिंदे गटातील एक आमदार म्हणाला की, शिंदे अजूनही फडणवीस यांच्या अपमानामुळे दु:खी आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कालखंडात, शिंदे आणि फडणवीस यांचं नातं तणावपूर्ण होतं. आता, फडणवीस शिंदेकडून बदला घेत आहेत, कारण शिंदेंकडे सध्या कोणतेही महत्त्वाचे खाते नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शांनी शिंदे यांना आश्वासन दिलं होतं की, “तुम्हीच 2024 नंतर मुख्यमंत्री असाल, निवडणुकीत सढळ हस्ते खर्च करा,” पण शहा यांनी हे आश्वासन पाळले नाही आणि शिंदेंना धोका दिला, असा दावा राऊत यांनी केला. तसंच, शिंदे यांचा फोन टॅप होण्याचा संशय देखील त्यांच्या गटातील एका आमदाराने व्यक्त केला. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या दिशेने जात आहे, हे पाहणं महत्वाचं आहे. शेवटी राऊतांनी असं म्हटलं की भाजप कोणाचाही नाही. शिंदे गट आणि भाजप यांच्या प्रतिक्रियांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Eknath shindes phone is being tapped from delhi claims sanjay raut nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात
1

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका
2

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका

अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मदत
3

अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.