''ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही अशा लोकांनी...''; नवनीत राणांची संजय राऊतांवर जोरदार टीका
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे असे वक्तव्य केले होते. त्यानंतर खासदार संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली. त्यातच आता देशाचे गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यावरून आता अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे.
माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ते दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात. दरम्यान त्यांच्या दौऱ्यावरून संजय राऊतांनी ‘सगळे उद्योग गुजरातला घेऊन चालले आहेत, आता लालबागच्या राजाला घेऊन जातील’ अशी टीका केली होती. तसेच राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. यावर बोलताना नवनीत राणा यांनी ज्यांना कळत नाही त्यांनी बोलू नये’ अशी टीका राऊतांवर केली आहे.
लालबागच्या राजाचे दर्शन 🙏🙏 pic.twitter.com/GutkUQnc8v
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) September 8, 2024
माजी खासदार नवनीत राणा यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, ”ज्या प्रामाणिकपणे आम्ही लोकांसाठी काम करत आहोत, त्यासाठी आम्हाला अधिक ताकद द्यावी. आमचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची जोडी सदाबहार राहावी. येणाऱ्या भविष्यात त्यांच्या कामावरच येऊ दे” अशी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली .
हेही वाचा: तुमच्यात हिंमत असेल तर…; संजय राऊतांचे अमित शाहांना खुले चॅलेंज
संजय राऊतांबाबत विचारले असता नवनीत राणा म्हणाल्या, ”मला वाटते विचित्र बोलणारी जी लोकं आहेत, त्यांच्याबद्दल काही बोलू नये. ते दिवसा जे स्वप्न पाहत आहेत ते काही खर होणार नाही. सरकार तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचेच येणार आहे. ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, अशा लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या हुशारीबाबत बोलू नये.”
पवांरांच्या डोक्यात काय चाललंय हे विचारायला फडणवीसांच्या डोक्यात मेंदू आहे का, हे त्यांना कोणी सांगितले. पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात, पवाराच्या डोक्यात काय चाललंय हे फडणवीसांना कळलं असतं तर आज त्यांच्या आयुष्याची, प्रतिष्ठेची आणि राजकारणाची जी घसरण झाली आहे, ही अवस्था झाली नसती ना, शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही. त्यांच्या डोक्यात काय चाललंय 2019 साली देखील फडणवीसांना कळलं नव्हतं. पण तरीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच ना, हिंमत असेल तर 2024 ला वेळेत निवडणूक घ्या. मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि काय बाहेर येतेय ते समजेल फडणवीसांचा मेंदू काम करायचंच बंद होईल, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.