Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली

२०२५-२६ या वर्षात राज्यात तब्बल ११८ स्टिंग ऑपरेशन्सचे नियोजन करण्यात आले होते, ज्यापैकी १३ मोहिमा पूर्णपणे यशस्वी ठरल्या आहेत. सीमेपलीकडील राज्यांमध्ये जाऊन बेकायदेशीर चाचण्या करण्याचे प्रमाण वाढल्याने सीमावर्ती २१ जिल्ह्यांमध्ये विशेष पाळत ठेवली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 27, 2026 | 02:08 PM
चिंताजनक ! राज्यात मुलींचा जन्मदर पुन्हा घटला; सेक्स रेशो 912 वरून 897 वर

चिंताजनक ! राज्यात मुलींचा जन्मदर पुन्हा घटला; सेक्स रेशो 912 वरून 897 वर

Follow Us
Follow Us:

मुंबई / राम खांदारे : राज्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची कडक अंमलबजावणी होत असल्याचा दावा केला जात आहे. असे असतानाच, राज्याच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत अहवालातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक वास्तव समोर आले आहे.

नागरी नोंदणी प्रणालीच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात जन्मतः लिंग गुणोत्तर कमालीचे घसरले आहे. सन २०२४ मध्ये राज्यात हे प्रमाण प्रति हजार मुलांमागे ९१२ मुली इतके होते, जे सन २०२५ च्या प्राथमिक अहवालानुसार थेट ८९७ वर खाली आले आहे. एकाच वर्षात झालेली ही मोठी घसरण राज्यातील गर्भलिंग निदान करणाऱ्या बेकायदेशीर टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचा स्पष्ट संशय मानला जात आहे.

लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना मोठा दणका; सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, पैशांची होणार वसुली

२०२५-२६ या वर्षात राज्यात तब्बल ११८ स्टिंग ऑपरेशन्सचे नियोजन करण्यात आले होते, ज्यापैकी १३ मोहिमा पूर्णपणे यशस्वी ठरल्या आहेत. सीमेपलीकडील राज्यांमध्ये जाऊन बेकायदेशीर चाचण्या करण्याचे प्रमाण वाढल्याने सीमावर्ती २१ जिल्ह्यांमध्ये विशेष पाळत ठेवली जात आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून आवश्यक उपाययोजना

निकषानुसार, लिंग गुणोत्तर ९५२ एवढा असणे आवश्यक आहे. मात्र, एक हजार मुलांमागे १५३ मुली कमी जन्माला येत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी राज्याने ‘खबरी’ आणि ‘डिकॉय’ यांच्यासाठी जाहीर केलेले बक्षीस थेट १ लाख रुपये केले आहे.

अभियानाचा फंड संपवण्याचा कार्यक्रम सुरु

डिकॉय ऑपरेशन असो वा स्टिंग ऑपरेशन असो हे काढण्याचे नाटक आहे. त्यामुळे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा फंड संपवण्याचा कार्यक्रम सुरु आहे. डीकॉय ऑपेरेशन गंभीरपणे केल्यास मुली वाचल्या पाहिजे होत्या. यापूर्वी पीसीपीएनडीटी कायद्याने १११ प्रकरणात शिक्षा लागली होती, त्या १११ प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर सरकार उच्च न्यायालयात का गेले नाही? सरकारी वकीलच केस हरतो का? प्रकरण गंभीरपणे हाताळलं नाही तर अधिकारी आणि वकील यांची चौकशी लावा तरच या प्रकरणात कायद्याची वचक निर्माण होईल.

– वर्षा देशपांडे, प्रवक्ता, लेक लाडकी अभियान.

Web Title: Girl child birth rate drops again in maharashtra sex ratio falls from 912 to 897

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • maharashtra news

संबंधित बातम्या

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
1

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार
2

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू
3

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू

Maharashtra Weather:  राज्यात दुष्काळाची घोषणा, पण आभाळ पुन्हा बरसणार! ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
4

Maharashtra Weather: राज्यात दुष्काळाची घोषणा, पण आभाळ पुन्हा बरसणार! ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.