
(Jalgaon News :फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अमळनेर (वा.) येथे बलिप्रतिपदेनिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेची शहरातून सवाद्य भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात वातावरणात काढण्यात आली. मिरवणुकीनंतर बळीराजा स्मारकावर आजी माजी आमदारांसह मान्यवरांनी विधिवत बळीराजाचे पूजन करून अभिवादन केले. मिरवणुकीमध्ये सजविलेल्या वाहनावर महात्मा बळीराजा यांचा भव्य फोटो ठेवण्यात आला होता तर भव्य नांगरसोबत व बाल शिवराय व राजमाता जिजाऊ उभे असलेली बैलगाडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. Jalgaon News:
मिरवणुकीची सुरुवात पटवारी कॉलनीतून मांडळ येथील जेष्ठ शेतकरी पंढरीनाथ पाटील, जेष्ठ कार्यकर्ते मनोहर निकम यांच्या हस्ते बैलगाडी व नांगर पूजनाने करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, श्याम पाटील, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, माजी सभापती डॉ. दिपक पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, कैलास आदी मान्यवर उपस्थितीत होते. Jalgaon News
मिरवणुकीमध्ये सजविलेल्या वाहनावर महात्मा बळीराजा यांचा भव्य फोटो ठेवण्यात आला होता तर भव्य नांगरसोबत व बाल शिवराय व राजमाता जिजाऊ उभे असलेली बैलगाडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ठिकठिकाणी नागरिकांनी प्रतिमेचे दर्शन घेऊन पुष्पवृष्टी केली.
यावेळी युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, शेतकी संघ संचालक संजय पाटील, विक्रांत पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, डी. एम. पाटील, महेश पाटील, वाल्मीक पाटील, एल.टी. पाटील, सयाजीराव पाटील, विवेक पाटील, मराठा समाज मंडळाचे शेखर पाटील, दत्तू शामराव पाटील, नगरसेवक सचिन पाटील, संजय पाटील, पवार आप्पा, योगेश शिंदे, भरत बोरसे, बाळू संतोष पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रास्ताविकात प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी बळीराजाची महती सांगितली. अर्बन बैंक संचालिका वसुंधरा लांडगे यानी जिजाऊ वंदना म्हटली. त्यानंतर शेतकरी गीत वाजणाऱ्या बँडसह मिरवणूक मराठा कॉलनी, शिरूड नाका, स्वामी समर्थ मंदिर, विजय मारुती, धुळे रोड मार्गे महाराणा प्रताप चौक, येथून फुलांनी सजवलेल्या महात्मा बळीराजा स्मारकावर पोहचली. मिरवणुक समारोपप्रसंगी माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी स्मारकावर बळीराजा पूजन केले. बळीराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेले होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. बी एस पाटील यांनी ‘इडा पिडा टळून बळीचे राज्य यावे यासाठी शेतकऱ्यांनी संघटित व्हावे, असे आवाहन केले.
Ans: बलिप्रतिपदेनिमित्त महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
Ans: मिरवणुकीची सुरुवात पटवारी कॉलनी येथून झाली.
Ans: भव्य नांगर, सजवलेले वाहन आणि बाल शिवराय व राजमाता जिजाऊ यांची प्रतिकृती असलेली बैलगाडी आकर्षण ठरली.