Governor Jishnu Dev Varma
उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा पुढे म्हणाले, “बँका आणि वित्तीय संस्था या केवळ कर्ज आणि वित्तीय सेवा पुरवठादार नाहीत. तर त्या राष्ट्र उभारणीतील महत्त्वपूर्ण भागीदार आहेत. तंत्रज्ञान बँकिंग क्षेत्राला नवे रूप देत असताना, आपण एक अशी स्थिर, नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक वित्तीय प्रणाली उभारली पाहिजे, जिथे कर्ज उत्पादक क्षेत्रांपर्यंत पोहोचेल, तंत्रज्ञान जनतेची सेवा करेल आणि वित्तीय संधी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विस्तारतील.”
भारताच्या दीर्घकालीन आर्थिक आकांक्षांमध्ये बँकिंग क्षेत्राच्या योगदानावर प्रकाश टाकताना इंडियन बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अतुल कुमार गोयल म्हणाले, “२०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताचे बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्र हे मुख्य उत्प्रेरक ठरू शकते. या महत्त्वाकांक्षेला पाठबळ देण्यासाठी या क्षेत्राने आर्थिक विकासाच्या संधी खुल्या करणे, उत्पादकता वाढवणे, डिजिटल परिपक्वता साध्य करणे आणि मजबुती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नवीकरणीय ऊर्जा, सेमीकंडक्टर्स आणि एमएसएमई यांसारख्या नवोदित क्षेत्रांसाठी वित्तपुरवठा मजबूत करणे, एआईचा वापर करणे आणि सायबर सुरक्षा समाविष्ट करणे या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल.”
‘असोचॅम’चे अध्यक्ष श्री. निर्मल के. मिंडा यांनी सुशासनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “भारत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास सुनिश्चित करत पायाभूत सुविधा, एमएसएमई वाढ, उत्पादन, गृहनिर्माण, कृषी आणि नवोदित उद्योगांना पाठबळ देण्यात वित्तीय संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. डिजिटलायझेशन, फिनटेक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या युगात विश्वास, पारदर्शकता, मजबूत सुशासन, सायबर सुरक्षा आणि जबाबदार कर्जवाटप हेच वित्तीय प्रणालीचे आधारस्तंभ राहिले पाहिजेत.”
‘असोचॅम’ नॅशनल कौन्सिल फॉर बँकिंगचे सह-अध्यक्ष आणि येस बँकेचे कार्यकारी संचालक श्री. मनिष जैन म्हणाले, “पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा करणे, एमएसएमईंना सक्षम करणे आणि ऊर्जा संक्रमणास पाठबळ देण्यात वित्तीय क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ॲडव्हान्स्ड डिजिटल अंडररायटिंग, इकोसिस्टम-आधारित वित्तपुरवठा मॉडेल आणि जागतिक मूल्य साखळीत लहान व्यवसायांचे अधिक एकत्रीकरण याद्वारे एमएसएमई क्षेत्रातील ३० ट्रिलियन यूएस डॉलरची पत-तूट भरून काढणे सर्वसमावेशक विकासाला पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे.”
या परिषदेत असोचॅम ईवाय नॉलेज रिपोर्ट चे अनावरण करण्यात आले. तसेच बँकिंग आणि वित्तीय कर्ज पुरवठा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा आणि दिग्गजांचा विशेष सत्रात सत्कार करण्यात आला. परिषदेचा समारोप ‘असोचॅम’चे सरचिटणीस श्री. सौरभ सान्याल यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी सरकार, नियामक आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.






