भावेश भिंडेच्या याचिकेवर उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी (फोटो सौजन्य- pinterest)
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला पोलिसांनी बेकादेशीरपणे अटक केल्याची याचिका भिंडेच्या वतीने वकील रिझवान मर्चंट यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात उद्या 9 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. भावेश भिंडेने न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेवर काल सुनवाणी पार पडली. यावेळी पोलिसांनी भावेश भिंडेच्या याचिकेला विरोध करत अटकेचे समर्थन केले. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयाने निर्णय राखूवन ठेवला असून उद्या 9 ऑगस्ट रोजी याप्रकरणी सुनावणी पार पडणार आहे.
हेदेखील वाचा- हेदुटणे, उत्तराशीव मधील जमीन हस्तांतरणास मनसेचा विरोध; गुरुचरण जागा रुग्णालयासाठी आरक्षित करण्याची राजू पाटलांची मागणी
13 मे रोजी घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक जण जखमी झाले होते. याप्रकरणी इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे याला पोलिसांनी अटक केली. आपल्याला करण्यात अटक चुकीचे असल्याचे सांगत भावेश भिंडेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा भिंडेच्या अटकेचे समर्थन करत त्याची याचिका फेटाळण्याची विनंती न्यायालयाकडे केली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने या याचिकेवरील निकाल राखून ठेवला.
इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेच्या वतीने वकील रिझवान मर्चंट यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यादरम्यान मुंबई पोलिसांच्यावतीने विशेष सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी सांगितलं की, घाटकोपरमध्ये 13 मे रोजी होर्डिंग पडल्यानंतर भावेश भिंडे फरार झाला होता आणि तो वेश बदलून राहत होता आणि नाव बदलत होता. तो त्याचे ठिकाणही सतत बदलत होता.
हेदेखील वाचा- महिलेचे केस ओढणं किंवा तिला ढकलणं विनयभंग….,मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
वेणेगावकर यांनी सांगितलं की, अखेर तो राजस्थानमधील उदयपूर येथे असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक 16 मे रोजी उदयपूरला गेले आणि त्याला पोलिसांनी मुंबईत आणले. जेव्हा पोलिसांची खात्री पटली की तो भावेश भिंडेच आहे, तेव्हा 17 मे रोजी त्याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी भिंडे याला 16 मे रोजी अटक केली नाही. त्याला मुंबईत आणल्यानंतर चोवीस तासांत दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली. यावेळी वेणेगावकर यांनी भिंडे याचे वेगवेगळ्या वेशातील फोटोही न्यायालयात सादर केले.
भिडे याचे वकील रिजवान मर्चंट यांनी युक्तिवाद केला की, पोलिसांनी याचिकाकर्ते भिडे याला 16 मे रोजी उदयपूर येथून अटक केली होती. तिथे त्याला मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करून ट्रान्झिट रिमांडवर घ्यायला हवे होते. पण पोलिसांनी बेकायदेशीरपणे भिंडे याला एक दिवस अटक करून दुसऱ्या दिवशी मुंबई दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला असून उद्या या प्रकरणी सुनावणी होणार आहे.