राज्याला मुसळधार पावसाचा फटका
मराठवाडा, कोकणात जोरदार
पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता
Mumbai Rain News: गेले काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात आणि खास करून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका रामलीला मंडळांना बसल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे आपले कार्यक्रम रद्द करण्याची वेळ मंडळांवर आली आहे.
मुंबईच्या चर्चगेट येथील जवळच्या मैदानात सुरू असलेले रामलीला कार्यक्रम रद्द करण्याची वेळ मंडळांवर आली आहे. याला कारण ठरले आहे मुंबई सतत पडणारा पाऊस. यामुळे रामलीला मंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रामलीला मंडळांनी आपले गाऱ्हाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेले आहे.
मुंबईतील रामलीला मंडळांना आर्थिक मदत देण्याची या साथी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी रामलीला मंडळांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे. श्री रामलीला मंडळाचे अध्यक्ष संदीप शुक्ला यांनी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. यावेळी त्यांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रामलीला कार्यक्रमात खंड पडल्याची खंत व्यक्त केली.
Maharashtra Rain Alert: मराठवाड्यातील धरणांतून मोठा विसर्ग; आपत्कालीन विभागाने घेतला ‘हा’ निर्णय
रामलीला सादर करण्यासाठी बाहेरच्या राज्यातून कलाकार मुंबईत येत असतात. या कलाकारांची योग्य ती सोय देखील करण्याची मागणी रामलीला मंडळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. रामलीलेशी सबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मुसळधार
राज्यात मागील २४ तासात पालघर जिल्ह्यात २१ मि.मी., मुंबई शहर १७ मि.मी., रत्नागिरी १६ मि.मी., सिंधुदुर्ग १२ मि.मी. आणि रायगड जिल्ह्यात १२ मि.मी. इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात पुरात वाहून आणि भिंत पडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून नाशिक व पालघर जिल्ह्यात प्रत्येकी एक व्यक्ती जखमी झाली आहे. तसेच वीज पडून व पुरात वाहून धुळे जिल्ह्यात दोन, नांदेड जिल्ह्यात सात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा आणि लातूर जिल्ह्यात चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच सातारा जिल्ह्यात दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२.०९ वा. कोयनानगर परिसरात ३.४ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.