hindusthani bhau
मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी (Students Protest) भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युट्यूब – ब्लॉगर हिंदुस्थानी भाऊ (Hindusthani Bhau) उर्फ विकास पाठकने (Vikas Pathak) वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात (Bandra Court) दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने (Hindusthani Bhau Bail Application Rejected) मंगळवारी फेटाळून लावला.
राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आंदोलन सुरू केले. मुंबईतही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई करत हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठकला अटक केली होती. त्यांतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे जामीनाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे हिंदुस्थानी भाऊने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, सदर प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात असून अधिकची चौकशी आणि तपास आवश्यक असल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून न्यायालयात केला आणि त्यांनी भाऊच्या जामीन अर्जाला विरोध केला. त्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
[read_also content=”चिप्सच्या पाकिटापासून या बाईने बनवली साडी, व्हिडिओ पाहून तुम्ही लावाल डोक्याला हात https://www.navarashtra.com/viral/viral-video-of-unique-saree-made-from-chips-packet-nrsr-234784.html”]
सत्र न्यायालयात अर्ज करणार
दंडाधिकारी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असला तरीही आपण मुंबई सत्र न्यायालयात या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे हिंदुस्थानी भाऊच्यावतीने सांगण्यात आले.