
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
३७ वर्षीय गर्भवती महिला पोलीस शिपाई वनिता हजारे असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. वनिता हजारे यांनी २०२१ मध्ये विनायक घाडगे (३७) याच्याशी विवाह केला. घाडगे ट्रान्सपोर्ट व्यवसाय करतो. विवाहाच्या सुरुवातीच्या काळात आपली ड्युटी फिरत्या शिफ्टमध्ये असल्याने सासरच्या मंडळींकडून स्वयंपाक व माहेरून सोने न आणल्याच्या कारणांवरून वारंवार टोमणे मारले जात असल्याचे तिने म्हटले आहे. सासरच्या लोकांनी तिच्या पतीला भडकवले असून तो मद्यपी असल्याचा आरोपही तिने केला आहे. तिच्या सासरच्या मंडळींकडून सतत छळ करण्यात येत होता. सततच्या छळाला कंटाळून ती आपल्या चार वर्षांच्या मुलीसह अंधेरी येथील पोलीस वसाहतीत राहायला गेली. काही दिवसांनी तिचा पती विनायक घाडगे हा देखील तिच्यासोबत राहायला गेला.
चार पाच महिने सगळं सुरळीत होत. त्यानंतर तो पुन्हा जुन्या सवयींमध्ये गेला आणि दारूच्या नशेत तिच्यावर शिवीगाळ करत पगाराची मागणी करू लागला. त्याने पनवेल येथे एक ट्रक आणि एक फ्लॅट खरेदी केला असून, घरखर्च चालवणाऱ्या हजारे यांच्यावरच ईएमआय भरण्याचा दबाव टाकत होता. ईएमआय भरण्यास नकार दिल्यास तिला मारहाण व धमक्या दिल्या जात असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
पोलीस ठाण्यात केली मारहाण
३० डिसेंबरला विनायक घाडगे हा अंधेरी पोलीस ठाण्यात आला. त्याने गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी पुन्हा पैश्यांची मागणी केली. नका दिल्यानंतर त्याने तिच्यावर हल्ला चढवला. त्याच्या हातात असलेला ब्रेसलेट तिच्या डोक्याला जोरात लागल्याचे आरोप तिने केला आहे. घटनेवेळी उपस्थित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने हस्तक्षेप करून आरोपीला तेथून हाकलून लावले.
पीडित महिला शिपायाने दाखल केली तक्रार
ही घटना घडल्यानंतर पीडित महिला पोलीस शिपायाने सासरच्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तारकारीच्या आधारे, पती विनायक घाडगे, सासू परुबाई, तसेच वहिनी भाग्यलक्ष्मी, वैशाली आणि उज्ज्वला जैन यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ८५ (पती किंवा पतीच्या नातेवाईकांकडून महिलेला क्रूर वागणूक) तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Akola Crime : ‘रक्षकच भक्षक?’ महामार्गावर तरुणीचा पाठलाग; अश्लील बोलणे व हातवारे, पोलीस अधिकारी अटक
Ans: अंधेरी पोलीस ठाण्यात, मुंबई.
Ans: मारहाण, मानसिक छळ, पगार व ईएमआयचा दबाव.
Ans: भारतीय न्याय संहिता कलम 85 व इतर संबंधित कलमे.