Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटीचे 31 पैकी 21 विभाग तोट्यात; परिवहनमंत्र्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा

महाव्यवस्थापक माहिती व तंत्रज्ञान यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. पथकामार्फत महामंडळातील आर्थिक अफरातफर व अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 30, 2026 | 01:51 PM
एसटीचे 31 पैकी 21 विभाग तोट्यात; परिवहनमंत्र्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला 'हा' इशारा

एसटीचे 31 पैकी 21 विभाग तोट्यात; परिवहनमंत्र्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला 'हा' इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नात अपेक्षित वाढ करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत उत्पन्न वाढीचे ठोस परिणाम दिसून आले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांवर बदली, पदावनती वा निलंबनासारखी शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

राज्यात एसटीचे ३१ पैकी २१ विभाग तोट्यात आहेत. मंत्री सरनाईक म्हणाले, एसटी केवळ वाहतूक सेवा नसून, सामान्यांची जीवनवाहिनी आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या मान्य करून दिलासा दिला आहे. आता व्यवस्थापन व अधिकारी वर्गानेही जबाबदारीचे भान ठेवून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. केवळ बैठका घेऊन किंवा कागदोपत्री नियोजन करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे. यंदा एप्रिल व मे महिन्यात, भाडेवाढ लागू असूनही एसटीला तोटा सहन करावा लागला.

NCP Merger : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

वर्षातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या या दोन महिन्यांतील ही घसरण गंभीर असून, ती कशीच स्वीकारली जाणार नाही, असा सज्जड दम मंत्र्यांनी भरला आहे.

विशेष तपास पथक पूर्ण आढावा घेणार

महाव्यवस्थापक माहिती व तंत्रज्ञान यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. पथकामार्फत महामंडळातील आर्थिक अफरातफर व अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. प्रत्येक आगार, विभाग, प्रादेशिक कार्यालय आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन केले जाईल. प्रवासी वाढ, उत्पन्नवाढ, फेऱ्यांचे नियोजन, खर्च नियंत्रण, बसचा कार्यक्षम वापर याचा आढावा घेऊन जबाबदारी ठरविणार असल्याचेही सांगण्यात आले.

बदली, डिमोशन, निलंबन करणार

एसटीची स्थिती सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांनी रिझल्ट देण्याची वेळ आहे. महिन्यानंतर कामगिरीवरून निर्णय घेतले जातील. गरजेनुसार बदली, पदावनती किंवा निलंबनासारखी कारवाई करण्यात येईल. काम करणाऱ्यांना पाठबळ मिळेल; मात्र अकार्यक्षमता, उदासीनता आणि निर्षक्रयता खपवून घेतली जाणार नाही.

– प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

Web Title: Increase revenue within a month or face action transport minister warns st officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • ST buses

संबंधित बातम्या

एसटीत सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य; अकोला विभागात 3 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांकडे नवं कार्ड
1

एसटीत सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य; अकोला विभागात 3 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांकडे नवं कार्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.