मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली, मुंबई लेनवरील वाहतूक ठप्प
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरवरील खोपोलीनजीक बोरघाटात बोरघाटात दरड कोसळली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान वाहनांच्या लाबंच लांब रांगा लागल्या असून दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. राज्यात गेल्या दोन दिवसापांसून जोरदार पाऊस होत आहे. रायगड जिल्ह्यातही दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ठिकठीकाणी दरडी कोसळत आहेत. दरम्यान हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतुकीवरबी परिणाम झाला आहे.
राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद होत आहे. यामुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक धरणांचे पातळी झपाट्याने वाढू लागल्या आहेत. हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्याने अंधेरी सबवेसारख्या सखल भागांत पाणी साचले होते. मात्र, या पावसाचा फारसा परिणाम वाहतूक आणि रेल्वे सेवा यांच्यावर झालेला नाही. पुढील 3 ते 4 तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, हवामान खात्याने मुंबई आणि आसपासच्या भागांत अजून पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह ठाणे, कोकणातील अनेक भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे, तर मराठवाड्यातील अनेक जिल्हे अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
Mumbai Water News: मुंबईकरांसाठी खुशखबर! तानसा ओसंडून वाहू लागला, पाण्याची चिंता मिटली
पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, आज त्यात अधिक वाढ झाली आहे. उद्या पालघरसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. सध्या पालघरच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. सूर्या प्रकल्पातील धामणी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे याचे तीन दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास धरणांमधून एकत्रितपणे जवळपास 9400 क्युसेक पाणी सूर्या नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.